प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:29 PM2020-01-15T23:29:32+5:302020-01-15T23:30:07+5:30

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते

148 farmers deprived of benefit of PM crop insurance scheme; Insolvency of insurance company | प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

Next

पाली : स्टेट बँक, विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित असल्याचा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुधागड-पाली तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेऊन न्याय मिळविण्यासाठी संबंधित स्टेट बँक आॅफ इंडिया पाली शाखा, कृषी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी संबंधित अधिकाºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब का झाला, त्या वेळी स्टेट बँके च्या व्यवस्थापकांनी विमा कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगितले.

त्यावर विमा कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आले की, कालावधीदरम्यान स्टेट बँकेने कागदपत्र न दिल्याने हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक व विमा कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात आल्याने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक व विमा कंपनी यांना नोटीस काढून बोलाविण्यात आले. त्या वेळी कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आले की, स्टेट बँकेच्या हलगर्जीमुळेच सुधागड तालुक्यातील १४८ शेतकºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागला आहे. त्यावर १४८ शेतकºयांना ५८ लाख ३० हजार ५१८ इतकी रक्कम स्टेट बँकेने द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निकालाद्वारे म्हटले आहे.

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते; परंतु २०२० लागला तरी शेतकºयांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असतानाही स्टेट बँक व विमा कंपनी शेतकºयांची दिशाभूल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत पैसे स्टेट बँकेने व विमा कंपनीने न दिल्यास शेतकरी पाली येथील स्टेट बँके समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मी, पीक विमा सन २०१७ ला भरला, त्यानंतर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल; परंतु दोन वर्षे झाली तरी ८८ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही. - सदानंद कोंडे, शेतकरी.

जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडून प्रक्रिया सुरू आहे. - नितीन म्हात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पाली

शेतकºयांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन स्टेट बँकेच्या समोर धरणे आंदोलन करू. - विलास उतेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष.

Web Title: 148 farmers deprived of benefit of PM crop insurance scheme; Insolvency of insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी