पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:52 PM2020-12-14T15:52:33+5:302020-12-14T15:52:59+5:30

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना नको असलेले शेती कायदे त्यांच्यावर लादत आहे.

Youth Congress protests in front of Union Minister Javadekar's house in Pune; Police took him into custody | पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात 

पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात 

googlenewsNext

पुणे: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने करून पाठिंबा दिला. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.कोथरूड पोलिसांनी तासाभरानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. 

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या घरासमोर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जमा झाले. त्यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या ऊपस्थितीत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मालके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. 

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला मात्र तरीही सर्वजण घरासमोरच ठिय्या देऊन बसले होते. तासाभराने कोथरूड पोलिस तिथे आले. त्यांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन तिथून हलवले व नंतर सोडून  दिले. 

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना नको असलेले शेती कायदे त्यांच्यावर लादत आहे, सरकारी यंत्रणेचे साह्य घेत सत्तेच्या जोरावर शेतकरी आंदोलन दडपून टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही असे यावेळी मोरे यांनी सांगितले. 
 

Web Title: Youth Congress protests in front of Union Minister Javadekar's house in Pune; Police took him into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.