तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:59 PM2019-09-29T18:59:31+5:302019-09-29T19:01:08+5:30

काॅंग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माेदींच्या हाऊडी माेदी या कार्यक्रमावर टीका केली.

youth are getting more degrees therefore they are unemployed | तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

Next

पुणे : भारतातील तरुण माेठ्याप्रमाणावर उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बेराेजगारीचे प्रमाण वाढत असल्याचा अजब अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे, मंत्रालय असे म्हणत असेल तर हाच माेदींचा नवा भारत आहे का, असा सवाल काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी माेंदी सरकारला केला. पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माेहन जाेशी आदी उपस्थित हाेते. 

गाैरव वल्लभ म्हणाले, देशात दरवर्षी एक कराेड लाेक पदवी घेतात, त्यातील बहुतांश लाेकांना नाेकऱ्या मिळत नाहीत. सध्या देशात  20 ते 24 या वयाेगटामधील तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण 40 टक्के आहे. यातही शहरातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सव्वातीन करोड लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. पुण्यातील उत्पादन कंपन्यांमधील 3 लाख लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आणखी 10 लाख लाेकांच्या नाेकऱ्या जाण्याची शक्यता आहे. ही माहिती खुद्द भारत सरकारनेच दिली आहे. एकीकडे बेराेजगारी राेज वाढत असताना तसेच देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान माेदी हाऊडी माेदी कार्यक्रमात व्यस्त आहेत. सध्या देशावर 89 लाख काेटी रुपयांचे कर्ज आहे. देशाचा जीडीपी आज 5 टक्क्यांवर आहे. कृषिक्षेत्राचा तर दाेन टक्क्यांवर आहे. शेतकरी, व्यावसायिक कोणीच सुखाने जगू शकत नाहीये. असंघटित क्षेत्र बंद पडले आहे. वाहन क्षेत्रात मंदी आहे कारण लाेकांकडे वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. असे सर्व असताना माेदी अमेरिकेत जाऊन विविध भाषांमध्ये भारतात सर्व ठिक आहे असे म्हणतात. 

पीएमसी बॅंकेबाबत बाेलताना वल्लभ म्हणाले, पीएमसी बॅंक मागील वर्षापर्यंत 100 कराेड रुपये फायद्यात हाेती. 23 ते 25 सप्टेंबर या काळत असं काय झालं की नागरिकांना पैसे काढण्यासाठी निर्बंध लादले गेले. लाेकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व बॅंक बॅंकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळाेवेळी सूचना देत असते, पीएमसी बॅंकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही. या बॅंकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपाच्या एका खासदाराचा मुलगा आहे, त्यामुळे या बॅंकेच्या व्यवहारांबाबत शंका येते. बॅंकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नाेटबंदीची पुनरावृत्ती आहे. नागरिकांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काॅंग्रेसची मागणी आहे. 

हाऊडी माेदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी माेदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत माेदी ट्रॅम्प यांच्याशी काही बाेलले नाहीत. भारतातून निर्यात हाेणारा बासमती भात आणि सफरचंद अमेरिका यावर रासायनिक फवारणी केली आहे असे म्हणत परत पाठवत आहे, त्याबाबत देखील माेदींनी कुठलिही चर्चा केली नाही. आयात हाेणाऱ्या वस्तूंवर अमेरिका माेठ्याप्रमाणावर कर लावत आहे त्यावर सुद्धा माेदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली हे माेदींने जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम केवळ माेदींची खासगी भेट हाेती असेच समजावे लागेल. 

काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात न घेता 370 रद्द करणे हे असंवेधानिक आहे असेही वल्लभ यावेळी म्हणाले. 

Web Title: youth are getting more degrees therefore they are unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.