वाल्हे येथे राजे यशवंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:11 AM2021-01-15T04:11:18+5:302021-01-15T04:11:18+5:30

१७६१ साली आजच्या दिवशी अर्थात १४ जानेवरीला पानिपत येथे मराठा आणि अब्दाली या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये मराठ्यांचा ...

Worship of the image of King Yashwantrao Pawar at Walhe | वाल्हे येथे राजे यशवंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन

वाल्हे येथे राजे यशवंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन

googlenewsNext

१७६१ साली आजच्या दिवशी अर्थात १४ जानेवरीला पानिपत येथे मराठा आणि अब्दाली या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये मराठ्यांचा मोठा पराभव झाला. असंख्य मराठा सरदार शहीद झाले होते, त्यापैकीच एक असणाऱ्या पवार घराण्याचे राजे महाराजा यशवंतराव पवार यांच्याविषयी आजही वाल्हे व पचंक्रोशीत ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे. पानिपतच्या युद्धात पाच हजार पवार सैनिकांना वीरमरण आले होते. वाल्हे, आडाजीचीवाडी, अंबाजीचीवाडी, बाळाजीचिवाडी, मोरोजीचीवाडी, बहिर्जीचिवाडी, सुकलवाडी, मुकादमवाडी, वागदरवाडी, पवारवाडी, वडाचीवाडी आणि राख मधील सुमारे ३० ते ४० सैनिकांना वीरमरण आले. त्यांच्याच स्मरणार्थ आडाचीवाडी येथे सर्वाना आदरांजली वाहण्यात आली.

या घटनांना उजाळा देण्यासाठी धार संघटनेचे अध्यक्ष विकास पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आडाचीवाडीते सरपंच दत्तात्रेय पवार, अमर चव्हाण, राहुल पवार, विनय पवार, बाळू पवार, अमित पवार, माणिक पवार, रवींद्र पवार, हनुमंत पवार, गणपत खुटवड, मंदाकिनी पवार, सूरज पवार, गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Worship of the image of King Yashwantrao Pawar at Walhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.