International Nurses Day : कोरोना संकटाशी निर्भीडपणे अहोरात्र भिडणारी 'रणरागिणी'; पुण्यातल्या जम्बोमधील परिचारिका दिनाची ही 'विशेष' कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:37 PM2021-05-12T19:37:22+5:302021-05-12T19:45:44+5:30

कोरोना संकटांशी थेट भिडणाऱ्या, रुग्णसेवे समर्पित भावनेने दिवसरात्र काम करणाऱ्या खऱ्या रणरागिणीचं प्रतीक म्हणजे प्रत्येक रुग्णालयात असणाऱ्या परिचारिका अर्थात नर्सेस....

World Nurse Day : Real Fighter in the Corona crisis; 'Special' story of Nurse Day in Jumbo hospital Pune | International Nurses Day : कोरोना संकटाशी निर्भीडपणे अहोरात्र भिडणारी 'रणरागिणी'; पुण्यातल्या जम्बोमधील परिचारिका दिनाची ही 'विशेष' कहाणी

International Nurses Day : कोरोना संकटाशी निर्भीडपणे अहोरात्र भिडणारी 'रणरागिणी'; पुण्यातल्या जम्बोमधील परिचारिका दिनाची ही 'विशेष' कहाणी

Next

पुणे: कोरोना संकटाने सर्वत्र थैमान घातले आहे.माणसापासून माणूस दुरावण्याची असंख्य उदाहरणे देखील अवतीभोवती घडलेली पाहायला मिळाली. तसेच काही ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकीसाठी अहोरात्र झटणारी माणसं देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेली दिसली. पण कोरोना संकटांशी थेट भिडणाऱ्या, रुग्णसेवेत झोकून देत दिवसरात्र काम करणाऱ्या,समाधान आणि हास्य चेहऱ्यावर बाळगत रुग्णांना ठणठणीत बरं करणाऱ्या खऱ्या रणरागिणीचं प्रतीक म्हणजे प्रत्येक रुग्णालयात असणाऱ्या परिचारिका अर्थात नर्स...

कोरोना संकटांशी लढताना आज पुण्यातील जम्बो रुग्णालयातील नर्सेस ने जागतिक परिचारिका दिन साजरा केला. यावेळी त्यांनी एकत्रित येत केक कापला. 

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजपर्यंत अविरतपणे आरोग्ययंत्रणा, सर्व डॉक्टर,नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना धीर देण्यापासून ते त्यांना ठणठणीत बरे करण्यापर्यंत मोठी जबाबदारी परिचरिकांवर आहे. आठ ते दहा तास, तर कधी कधी चौदा पंधरा तास देखील काम करण्याची वेळ या परिचारिकांवर ओढवते. पण कुठलीही तक्रार न करता सेवाभावी वृत्तीने या नर्सेस मेहनत घेत आहे.

पुण्यात आणि पिंपरीत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अति जलदगतीने जम्बो कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत इथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर नर्सेस सह मोठ्या प्रमाणावर इथे वैद्यकीय स्टाफ काम करत आहे. यावेळी या कोविड सेंटरमध्ये नेहमी काळजी, टेन्शन वाढवणारे वातावरण असते. मात्र, जम्बो रुग्णालयात बुधवारी (दि.१२) जागतिक परिचारिका दिनानिमित्त आनंद, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी सर्व नर्सेसने कोरोना संकटावर मात करण्याचा निर्धार देखील बोलून दाखविला.

Web Title: World Nurse Day : Real Fighter in the Corona crisis; 'Special' story of Nurse Day in Jumbo hospital Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.