पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास : राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:38 AM2019-08-16T11:38:59+5:302019-08-16T14:30:29+5:30

येत्या काही दशकात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असणार आहे़. त्यांना सेवा देण्याचे आव्हान असेल़...

Women more reliant on Pune police than men: Governor C. Vidyasagar Rao | पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास : राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव

पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास : राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव

Next
ठळक मुद्दे पुणे पोलिसांचे कौतुकसध्या सैनिकाला जी इज्जत मिळते ती पोलिसांना मिळाली पाहिजे, असा आमचा प्रयत्न पुण्यातील पोलिसांच्या घरदुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये मंजूर वाहतूक जनजागृती व पोलिसांच्या मुलांच्या वसतीगृहासाठी ५ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी

पुणे : पुणेकरांना चांगली सेवा देताना आपल्या अनेक कामाने किती लोकांचे समाधान झाले हे समजावून घेतात़. त्याचवेळी परिणामकारक पोलिसिंगविषयी लोकांच्या अपेक्षा स्वतंत्र एजन्सीमार्फत सर्वेक्षण करुन जाणून घेण्याबरोबरच ते प्रसिद्ध करतात, हे पुणे पोलिसांच्या दृष्टीने नक्कीच गौरवास्पद आहे़. पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव यांनी केले़. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरु केलेल्या सेवा व सुरक्षा बोध मानके यांचे लोकार्पण तसेच सिंबायोसिस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या वतीने पुण्यातील प्रभावी पोलीस प्रशासनाच्या आकलन आणि अपेक्षांबद्दलचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याच प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले़ यावेळी ते बोलत होते़. 
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय भेगडे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ़ शां. ब़ मुजुमदार, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे आदी उपस्थित होते़ 
राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, अनेकदा अशा प्रकारचे सर्व्हे हे निवडणुकाच्या काळात केले जातात़. पोलिसांकडून आपल्या सेवेविषयी प्रथमच अशाप्रकारे सर्व्हे  झाला आहे़. येत्या काही दशकात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असणार आहे़. त्यांना सेवा देण्याचे आव्हान असेल़. दहशतवादाचे वाढते आव्हान असणार आहे़. या सर्व्हेमधील माहिती पाहता पोलिसांविषयी सर्वसाधारण चांगले मत असल्याचे दिसून येते़.  लोकांना सेवा देतानाच त्याबद्दल १ लाख लोकांचे मत जाणून घेऊन समाधान करणे महत्वाचे आहे़.’’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच वर्षापूर्वी पोलीस दलात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता़. त्यामुळे राज्यात जातीय दंगली झाल्या नाहीत़. अपवाद वगळता गोळी उडाली नाही़. सध्या सैनिकाला जी इज्जत मिळते ती पोलिसांना मिळाली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे़. पुण्यातील पोलिसांच्या घरदुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये मंजूर केले असून वाहतूक जनजागृती व पोलिसांच्या मुलांच्या वसतीगृहासाठी ५ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली आहे़. 
प्रारंभी पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी सांगितले की, सर्व देशाला यंदा प्राणघातक अपघातात १० टक्के घट करुन दाखविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़. आतापर्यंत पुण्यात ३३ टक्के प्राणघातक अपघातात घट झाली आहे़.
सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पोलीस महासंचालकांच्या कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी लोकांना सेवा देताना आपल्या कामाचे स्वतंत्र एजन्सीमार्फत सिक्युरिटी ऑडिट करुन घेण्याची सचूना केली होती़. पंतप्रधान यांच्या सूचनेनुसार सिंबायोसिसने अगदी अमेरिकेच्या सॅपल साईजनुसार सर्व्हे केला आहे़ . यावेळी सेवा उपक्रम राबविणाºया पथक व पोलिसांना मदत करणाºयांचा गौरव करण्यात आला़. 

......

आता राज्यभरात भरोसा सेल
बालक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरोसा सेल आता संपूर्ण राज्यात सुरु करण्याचा आदेश राज्याचे पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी मंगळवारी काढला असल्याचे व्यंकटेशम यांनी सांगितले़.

Web Title: Women more reliant on Pune police than men: Governor C. Vidyasagar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.