जुन्नर तालुक्यातील 'आश्चर्यकारक' घटना; पाच वर्षांपूर्वी जुळ्यांना तर आता तीन बाळांना महिलेने दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:18 PM2021-06-22T17:18:18+5:302021-06-22T17:19:06+5:30

आई आणि बाळ सुखरूप, डॉक्टरांची माहिती

The women gave birth to twins five years ago and now three babies incident in Junnar taluka | जुन्नर तालुक्यातील 'आश्चर्यकारक' घटना; पाच वर्षांपूर्वी जुळ्यांना तर आता तीन बाळांना महिलेने दिला जन्म

जुन्नर तालुक्यातील 'आश्चर्यकारक' घटना; पाच वर्षांपूर्वी जुळ्यांना तर आता तीन बाळांना महिलेने दिला जन्म

googlenewsNext

जुन्नर (वडगाव कांदळी) : जुन्नर तालुक्यात हिवरे खुर्द येथील एका महिलेने पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी या महिलेने पुन्हा तीन बाळांना जन्म दिला असून बाळ व आई सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटना ऐकून परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

हिवरेखुर्द येथील ज्योत्स्ना विठ्ठल वायकर यांनी पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा गर्भधारणा होत नव्हती. मात्र त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी जुन्नरमधील श्री हाॅस्पीटल या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते उपचारासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना डाॅ.अविनाश पोथरकर व डाॅ. मुक्तांजली पोथरकर यांनी दिलासा देऊन होमिओपॅथी उपचार सुरु केले. या उपचाराने त्या पुन्हा गरोदर राहिल्या.  त्यानंतर त्यांनी दोन वेळा सोनोग्राफी केली. त्यांना सोनोग्राफीत तीन मुले असल्याचे आढळून आले. त्यामुळे डाॅक्टरांची चिंता वाढली होती. 

डाॅ.अविनाश पोथरकर व डाॅ. मुक्तांजली पोथरकर यांनी त्यांच्या अभ्यासानुसार होमिओपॅथीचे उपचार पुढे तसेच सुरु ठेवले व त्यानंतर ज्योस्त्ना यांना बाळंतपणासाठी डाॅ.पोथरकर यांनी रुग्णालयातदाखल करुन घेतले.सोमवारी ( दि २१) सकाळी ज्योस्त्ना यांनी तीन बाळांना सुखरुप जन्म दिला.यामध्ये २ मुले,१ मुलगी आहे. सर्व बाळांची वजने दोन किलोपेक्षा जास्त आहे.

एकाच वेळी तीन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डाॅ. पोथरकर यांनी सांगितले. या बाळांना व बाळाच्या आईला सुखरुप ठेवण्यासाठी डाॅ. अविनाश पोथरकर व डाॅ.मुक्तांजली पोथरकर यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली.

Web Title: The women gave birth to twins five years ago and now three babies incident in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.