पुण्यातील निर्बंधात सूट मिळणार का? दिलीप वळसे पाटील यांनी दिली विशिष्ट माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 02:12 PM2021-07-30T14:12:04+5:302021-07-30T14:13:17+5:30

लेव्हल ३ मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे.

Will there be relief in Pune restrictions? Specific information given by Dilip Walse Patil | पुण्यातील निर्बंधात सूट मिळणार का? दिलीप वळसे पाटील यांनी दिली विशिष्ट माहिती

पुण्यातील निर्बंधात सूट मिळणार का? दिलीप वळसे पाटील यांनी दिली विशिष्ट माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे पुण्याला काही प्रमाणात सूट देण्याबद्दल चर्चा सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळहळू कमी होत आहे. लसीकरणही वेगाने सुरु आहे. सध्या दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालू असतात. पण कोरोना आटोक्यात येत असल्याने व्यापारी वर्गाकडून वेळ वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विशिष्ट माहिती दिली आहे. 

पाटील म्हणाले, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेव्हल ३ मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे अजून निर्बंध शिथिल करण्याला मान्यता दिलेली  नाही. तथापि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं बोलणं झाल आहे. पुण्याला काही प्रमाणात सूट देण्याबद्दल चर्चा सुरु आहे. दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितल आहे. 

लसीकरणाबाबत पुणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. ते वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासाठी अधिक लस उपलब्ध करून देणार आहोत. असही ते म्हणाले.    

... यावर अजित पवारांची भूमिका 

कोरोनामुळे अनेक जण घरूनच काम करत आहेत. सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यांना खरेदी करता वेळ पाहिजे. त्या दृष्टीने शनिवार, रविवार जी सुट्टी आपण देतो त्यामध्ये रविवारी सुट्टी द्यावी आणि शनिवारी व्यवहार चालू राहावे, असा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यावेळी सर्व नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. 

तसंच “ग्रामीण भागात कोणीही मास्क वापरत नाहीत. मात्र पुण्यात नागरिक नियम पाळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे. नागरिकांनी देखील स्वतः च्या आणि दुसर्‍याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. असंही ते म्हणाले आहेत. 

Web Title: Will there be relief in Pune restrictions? Specific information given by Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.