धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:24 PM2019-12-21T21:24:55+5:302019-12-21T21:25:32+5:30

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही

Why Drinking water cutting when dam is full: Dr. Amol Kolhe | धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा

पिंपरी : पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय अडचणी आहेत आदींबाबत पाहणी करणार आहोत, असे सांगत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही. त्यावेळी पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र पाणीकपात का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 
खासदार डॉ. कोल्हे यांनी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला शनिवारी भेट दिली. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने आदी यावेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या वेळी कमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही योग्य नियोजनामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. परिणामी पाणी कपात न करता दरोरज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, हे कसले नियोजन आहे, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ह्यस्मार्ट सिटीह्णअंतर्गत अनेक कामे अर्धवट आहेत. ऑ प्टीकल फायबर लेईंगचे काम झाले आहे. मात्र, कव्हरिगंसाठी अनेक ठिकाणी फक्त मुरूम वापरला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे नक्की स्मार्टली होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे त्यांनी सांगितले.


 

Web Title: Why Drinking water cutting when dam is full: Dr. Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.