Sharad Pawar | शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात काय चर्चा झाली? पवार काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:07 PM2022-05-21T19:07:43+5:302022-05-21T19:24:51+5:30

द पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात आज पुण्यात बैठक पार पडली...

What was the discussion between Sharad Pawar and Brahmin organization in pune | Sharad Pawar | शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात काय चर्चा झाली? पवार काय म्हणाले...

Sharad Pawar | शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात काय चर्चा झाली? पवार काय म्हणाले...

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात आज पुण्यात बैठक झाली. यावर ब्राह्मण संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जाती धर्माबद्दल कोणीही वादग्रस्त बोलू नये. ब्राह्मण संघटनांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले. पक्षातील काही सदस्यांच्या वक्तव्यांमुळे ब्राह्मण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. या बैठकीत आरक्षणावरही चर्चा झाल्याचे शरद पवार म्हणाले.

या बैठकीबद्दल बोलताना, शरद पवारांसोबतची बैठक खेळीमेळीत पार पडली. यामध्ये ब्राम्हण समाजाला सन्मानाने जगता आलं पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने बेताल वक्तव्य करणाऱ्य नेत्यांवर आळा घातला पाहिजे. जे कोणी जातीवादी बोलणार असतील तर त्यावर आम्ही चर्चा करू. पवारांनी आमच्या अनेक शंकांचे निरसन करण्याच काम केलं. भगवान परशुराम महामंडळ मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती. ते लवकरच मुख्यमंत्री सोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती सभेत बैठकीत असणाऱ्या गोविंद कुलकर्णी यांनी दिली.

आरोप-प्रत्यारोपांच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार भूमिका घेत नाहीत तोपर्यंत बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका काही ब्राम्हण संघटनांनी यापूर्वी घेतली होती. अखेर आज पुण्यात शरद पवारांनी ब्राम्हण संघटनांशी चर्चा केली.

पवारांच्या कोणत्या वक्तव्यांवर ब्राह्मण संघटनांचा आक्षेप?
-पवारांनी समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते असा दावा केला होता.
-दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असाही दावा पवारांचा होता. 

शरद पवार शुक्रवारी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. आज (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता निसर्ग हॉटेल येथे ब्राम्हण संघटनांशी पवारांनी चर्चा केली.

औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले शरद पवार?

राज्यातील कोणत्याही स्थळाला अजून संरक्षण देण्याची वेळ आली नसल्याचे शरद पवार म्हणाले. सध्या जाणीवपूर्वक धर्माधर्मांत वाद निर्माण केले जात असल्याचेही पवार म्हणाले.

नवाब मलिकांवरील सर्व आरोप खोटे आहेत. आज कोर्टाने मत नमूद केलं आहे, निर्णय दिला नाही असं पवार म्हणाले

Web Title: What was the discussion between Sharad Pawar and Brahmin organization in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.