राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमेगॅलो हा नेमका कुठल्या प्रकारचा विषाणू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 01:09 PM2021-05-16T13:09:45+5:302021-05-16T13:14:04+5:30

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोकादायक

What type of virus is the cytomegalovirus infected by Rajiv Satav? | राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमेगॅलो हा नेमका कुठल्या प्रकारचा विषाणू आहे?

राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमेगॅलो हा नेमका कुठल्या प्रकारचा विषाणू आहे?

googlenewsNext
ठळक मुद्देविषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे होतो संक्रमित

पुणे: काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोना झाल्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. पण त्यानंतर त्यांना सायटोमेगॅलो विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. आज पहाटे त्यांचे निधन झाले. सायटोमेगॅलो विषाणूची लक्षणंही वेगळी आहेत.

सायटोमेगॅलो विषाणू म्हणजे काय?

सायटोमेगॅलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे संक्रमित करतो. 

सायटोमेगॅलोची लक्षण कोणती?

डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमेगॅलोची लक्षणं आहेत. सायटोमेगॅलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमेगॅलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणंही दिसून येतात. सायटोमेगॅलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोकादायक

ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात. रोग प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या विषाणूचा शरीरावर प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांना हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

Web Title: What type of virus is the cytomegalovirus infected by Rajiv Satav?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.