'त्या' लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केला; पतीने असा काही 'कहर' केला की थेट गुन्हाच दाखल झाला  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 03:35 PM2020-09-26T15:35:28+5:302020-09-26T15:36:56+5:30

पती-पत्नी दोघेच घरात राहतात. रात्री स्वयंपाक घरात फिर्यादी स्वयंपाक करीत होत्या.

What his wife opposed to 'that' type of love; The husband then did something that caused a direct crime | 'त्या' लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केला; पतीने असा काही 'कहर' केला की थेट गुन्हाच दाखल झाला  

'त्या' लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केला; पतीने असा काही 'कहर' केला की थेट गुन्हाच दाखल झाला  

Next
ठळक मुद्देया महिलेने पतीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा केला दाखल

पुणे : पत्नी अथवा प्रेयसी काम करत असताना पती मागून येऊन तिला लडिवाळ प्रेमाने मिठी मारतानाचे दृश्य अनेक चित्रपटात पाहिली आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला. परंतु, त्या लडिवाळ प्रेमाला पत्नीने विरोध केल्याने त्याचे रूपांतर थेट वादात झाले. अन् त्यावर चिडलेल्या पतीने मग तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत गालावर व नाकावर ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की, नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 
 
याप्रकरणी ३४ वर्षाच्या पत्नीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली असून तिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ३५ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील एअरपोर्ट रोडवरील एका उच्चभ्रु सोसायटीत २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेच घरात राहतात. रात्री स्वयंपाक घरात फिर्यादी स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी तिचा पती मागून येऊन तिच्याबरोबर मस्ती करु लागला. स्वयंपाक करण्यास आधीच उशीर झाला असताना त्यात पतीमध्ये येऊन लुडबुड करु लागल्याने फिर्यादी हिने त्याला विरोध केला. त्यावर चिडलेल्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यातून त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा पतीने तिला शिवीगाळ करुन गालावर व नाकावर जोरात ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की, तिच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा घाबरलेल्या पतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले़ तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान कशामुळे हा प्रकार घडला हे सांगितले. तेव्हा हॉस्पिटलमधून पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आले. पोलिसांनी येऊन चौकशी केली. उपचारानंतर बरे झाल्यावर या महिलेने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: What his wife opposed to 'that' type of love; The husband then did something that caused a direct crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.