"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:53 PM2021-06-05T13:53:26+5:302021-06-05T13:54:03+5:30

अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात असा निर्णय घेतल जातो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

"We don't attack in the back, we attack from the front ..."; Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis | "आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

"आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो.." ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

googlenewsNext

पुणे: अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता.त्याला आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही. समोरुन वार करतो असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतानाच विविध राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले. राऊत म्हणाले, अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे आम्ही त्यावेळीही सांगितले होते.आणि आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही, समोरुन वार करतो अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार केला.याचवेळी त्यांनी माझं नातं शिवसेनेशी आहे. सत्ता असली किंवा नसली तरी आमचं नातं सेनेशीच आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत, असेही राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले. 


अजित पावर यांच्या सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला: देवेंद्र फडणवीस
अजित पावर यांच्या सोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर एका वेबिनारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता.त्यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत झालेल्या शपथविधीमुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला मात्र, त्यावेळी आमच्या मनात राग होता. त्यातून आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु,आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. असेही फडणवीस म्हणाले होते. पण राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता.

Web Title: "We don't attack in the back, we attack from the front ..."; Sanjay Raut's reply to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.