२७ जानेवारीला पुणे शहरातील 'या' परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:09 PM2022-01-24T17:09:18+5:302022-01-24T17:10:48+5:30

गुरूवारी शहरातील कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार ते जाणून घ्या

water supply pune city will be closed on 27th january | २७ जानेवारीला पुणे शहरातील 'या' परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

२७ जानेवारीला पुणे शहरातील 'या' परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

googlenewsNext

पुणे : वारजे जलकेंद, खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी काम करावयाचे असल्यामुळे, येत्या २७ जानेवारी (गुरूवारी) कोथरूड, डेक्कन, बाणेर-बालेवाडी तसेच विमाननगर व लोहगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे़ तसेच २८ जानेवारी (शुक्रवारी) रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे़.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कामामुळे २७ जानेवारी रोजी वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे़ यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार असलेला भाग पुढील प्रमाणे (वारजे जलकेंद्र) : भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड

नवीन होळकर जलकेंद्राकडील परिसर : कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव, पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रस्ता, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलिस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटील इस्टेट, भांडारकर रस्ता इत्यादी़ 

Web Title: water supply pune city will be closed on 27th january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.