कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग,व्यवसाय बंद असूनही पुणे महापालिकेचा पाणीवापर तेवढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:34 PM2020-05-16T17:34:29+5:302020-05-16T17:49:14+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांकडून राखल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा अधिक वापर

The water consumption of the municipality is the same even though industries and businesses are closed | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग,व्यवसाय बंद असूनही पुणे महापालिकेचा पाणीवापर तेवढाच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग,व्यवसाय बंद असूनही पुणे महापालिकेचा पाणीवापर तेवढाच

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्प सुमारे ५ टीएमसी पाणी अधिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग ,व्यवसाय विविध सरकारी व खासगी कार्यालये बंदगेल्या काही महिन्यांत पुण्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या गेले आहे आपल्या गावी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग ,व्यवसाय विविध सरकारी व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मजूर कामगार पुण्याबाहेर जात आहेत.तरीही पुणे महानगरपालिकेच्या पाणी वापरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे पालिकेची पाण्याची गरज वाढत असल्याचे दिसून येत होते. तसेच सुमारे चाळीस टक्के पाणी गळती होत असल्याचेही बोलले जात होते. मात्र,कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांत पुण्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. तसेच चहाच्या टपऱ्या, लहान-मोठे हॉटेल्स, इतर उद्योग, व्यवसाय , शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे पालिकेला लागणाऱ्या पाण्यात घट होईल, असे जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु, त्यात कोणतीही घट झालेली नाही; अजूनही पालिकेकडून खडकवासला धरणातून दररोज १४.५० ते १४.६० एमएलडी पर्यंत पाणी उचलले जात आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्प सुमारे ५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे पाऊस काही दिवस उशिरा पुण्यात दाखल झाला तरी पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यास फारशी अडचण येणार नाही. खडकवासला धरण प्रकल्प शनिवारी (दि.१६) ९.२५ टीएमसी एवढे पाणी होते. मागील वर्षी याच तारखेला प्रकल्पात केवळ ४.४९ टीएमसी एवढे पाणी उपलब्ध होते. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण २८ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. तरीही खडकवासला धरण प्रकल्पामध्ये ९.२५ टीएमसी एवढे पाणी शिल्लक आहे.


दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांकडून राखल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा अधिक वापर होत असावा, त्यामुळे पालिकेच्या पाणी  वापरात घट झाली नसावी,असेही बोलले जात आहे.
--------------
पुणे महानगरपालिकेकडून खडकवासला धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही घट झालेली नाही दररोज सुमारे १४.५० ते १४.६० एम एल डी एवढे पाणी उचलले जात आहे. धरणातून शेतीसाठी कालव्या वाटे आवर्तन  सोडण्यात आले आहे. यंदा तिसरे ही आवर्तन सोडले जाणार आहे.-विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला 
----------
पुण्याच्या विविध विविध भागांमध्ये सुमारे दीड लाख स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अभ्यास करतात.त्यातील केवळ दोन ते अडीच हजार विद्यार्थी आता पुण्यात वास्तव्यास असतील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच कमी झाले आहे, असे एमपीएससी स्टुडंट्स राईट्स विद्यार्थी संघटनेचे महेश बडे यांनी सांगितले.
----------
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा

खडकवासला - १.१२ टीएमसी (६५.८२ टक्के)
पानशेत - ४.३८ टीएमसी (४१.१६टक्के)
वरसगाव ३.७४ टीएमसी (२९.२०टक्के)
टेमघर -००.०० टीएमसी (००.००टक्के)

Web Title: The water consumption of the municipality is the same even though industries and businesses are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.