अखेर प्रतीक्षा संपली! पुणे - मुंबई  दरम्यान धावणारी एकमेव 'डेक्कन क्वीन' शनिवारपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:00 PM2021-06-23T16:00:00+5:302021-06-23T16:00:06+5:30

पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या एकमेव डेक्कन क्वीन मागच्या महिन्यात बंद झाली होती

The wait is finally over! Deccan Express and Deccan Queen will run for Pune residents from Saturday | अखेर प्रतीक्षा संपली! पुणे - मुंबई  दरम्यान धावणारी एकमेव 'डेक्कन क्वीन' शनिवारपासून सुरु होणार

अखेर प्रतीक्षा संपली! पुणे - मुंबई  दरम्यान धावणारी एकमेव 'डेक्कन क्वीन' शनिवारपासून सुरु होणार

Next
ठळक मुद्देप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे

पुणे: प्रदीर्घ कालावधीनंतर पुणेकरांची प्रतीक्षा संपली आहे. शनिवार पासून पुणे ते मुंबई  (26 जून) डेक्कन एक्सप्रेस व डेक्कन क्वीन एक्सप्रेस सुरू होत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. पहिल्यांदाच विस्ताडोम कोच जोडला जाणार आहे.यामुळे पुणे - मुंबई प्रवास आनंददायक होणार आहे.

डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही 25 जून रोजी मुंबई हुन दुपारी 5 वाजून 10 मिनिटांनी निघेल. पुण्याला रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल. डेक्कन एक्सप्रेस मुंबई हुन सकाळी 7 वाजता निघेल. पुण्याला 11 वाजून 5 मिनिटांनी पोहचेल. तर हीच गाडी पुण्यातून दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी निघेल. मुंबईला संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पोहचेल. 

पुणे-मुंबई  दरम्यान धावणाऱ्या एकमेव डेक्कन क्वीन मागच्या महिन्यात बंद झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. नोकरीनिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांना असुविधांचा सामना करावा लागत होता. गेल्या लॉकडाउनपासून प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. मागील वर्षी रेल्वे सेवा बंद असल्याने कित्येक महिने प्रवाशांना भर पावसाळ्यात खासगी वाहनाने, दुचाकीने जीव धोक्यात घालून आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन सुरू करण्यात आली होती. पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने हि सेवा बंद केली होती. आता प्रवाशांची गैरसोय होणे थांबणार असून सर्वाना दिलासा मिळणार आहे.

Web Title: The wait is finally over! Deccan Express and Deccan Queen will run for Pune residents from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.