वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी विनोबा भावे आग्रही : मिलिंद बोकील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 08:01 PM2019-09-11T20:01:49+5:302019-09-11T20:02:06+5:30

विनोबा भावे यांच्या मते विज्ञानच जीवनाचा मुख्य भाग व जगण्याचा पाया असतो..

Vinoba Bhave insists on scientific approach: Milind Bokil | वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी विनोबा भावे आग्रही : मिलिंद बोकील

वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी विनोबा भावे आग्रही : मिलिंद बोकील

Next
ठळक मुद्देथोर स्वातंत्र्य सेनानी आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त व्याख्यान

पुणे :  स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले जयप्रकाश नारायण यांना सुद्धा आचार्य विनोबा भावे यांनी विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले होते. विनोबा भावे यांच्या मते विज्ञानच जीवनाचा मुख्य भाग व जगण्याचा पाया असतो. मनुष्याची प्रगती विज्ञानामुळेच झाली आहे. प्रत्येकाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. संकटसमयी न डगमगता केलेली कृती ही अहिंसाच असते असे त्यांचे विचार होते, असे मत प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले.
थोर स्वातंत्र्य सेनानी आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मुलांच्या पेरूगेट भावे स्कूलमध्ये विनोबा भावे : एक उत्तम शिक्षक या विषयावर बुधवारी बोकील यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ अ. ल. देशमुख होते. बालसाहित्यिक राजीव तांबे, भावे शाळेचे प्राचार्य रोहिदास भारमळ, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, मुकुंद तेलीचेरी उपस्थित होते.
बोकील म्हणाले,आचार्य विनोबा भावे यांची ओळख केवळ महात्मा गांधी यांचे शिष्य एवढ्यापूर्ती मर्यादित नाही. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही विनोबा भावे यांचे कार्य खूप मोठे आहे. श्रमाकडे त्यांनी प्रतिष्ठा म्हणून बघितले. ते चांगले गणिती होते. त्यांचा विज्ञानावर विश्वास होता. अहिंसा, हिंदुत्व याविषयी विनोबा भावे यांचे काय मत होते, याविषयीची काही उदाहरणे बोकील यांनी दिली. आचार्य विनोबा भावे मजेदार शिक्षक होते, असा उल्लेख करुन देशवासियांना जय जगत हा मंत्र दिल्याचे बोकील यांनी नमूद केले.
अ. ल. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात विनाबा भावे यांची वाचनाची आवड, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि आत्मविश्वास या गुणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विनोबा भावे यांच्यावर त्यांचे आजोबा व आईचा प्रभाव होता हे सोदाहरण स्पष्ट केले.
राजीव तांबे यांनी विनोबा भावे यांच्या आश्रमातील आठवणी सांगितल्या. सुरुवातीस संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्राचार्य रोहिदास भारमाळ यांनी उपक्रमाचे कौतुक करुन भविष्यात सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निकिता मोघे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Vinoba Bhave insists on scientific approach: Milind Bokil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.