व्हिडीओ : प्रजासत्ताक दिनाचे अनाेखे सेलिब्रेशन ; व्हिंटेज गाड्यांची काढण्यात आली रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 02:19 PM2020-01-27T14:19:24+5:302020-01-27T14:21:07+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिंटेज कारप्रेमींकडून अनाेखा उपक्रम राबविण्यात आला.

Video: vintage car rally on the occasion of republic day | व्हिडीओ : प्रजासत्ताक दिनाचे अनाेखे सेलिब्रेशन ; व्हिंटेज गाड्यांची काढण्यात आली रॅली

व्हिडीओ : प्रजासत्ताक दिनाचे अनाेखे सेलिब्रेशन ; व्हिंटेज गाड्यांची काढण्यात आली रॅली

googlenewsNext

पुणे : प्रजासत्ताक दिन माेठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. पुण्यातील एफसीसीसीआय या ग्रुपकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अनाेखा उपक्रम राबविण्यात आला. या ग्रुपने 40 ते 50 वर्ष जुन्या आपल्या व्हिंटेज गाड्या रस्त्यावर उतरविल्या हाेत्या. सकाळी या गाड्यांची शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली हाेती. 

पुण्यातील एस. एम. जाेशी पूलावरुन या रॅलीला सुरुवात करण्यात आली. यात 40 ते 50 वर्षापूर्वीच्या विविध प्रकारच्या फियाट कार हाेत्या. एस एम जाेशी पूलावर या 20 ते 30 फियाट कार एकामाेगामाग एक लावण्यात आल्या. त्यानंतर कर्वे रस्ता, डेक्कन, काेथरुड भागातून या गाड्यांची रॅली काढण्यात आली. काेथरुड येथे या रॅलीची सांगता झाली. रॅली नंतर ग्रुपच्या क्लबमध्ये झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी सर्व कारचे मालक उपस्थित हाेते. ही अनाेखी रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत हाेती. 

या रॅली बद्दल माहिती देताना एफसीसीआय ग्रुपचे सदस्य एफसीसीसीआय पुणे फियाट हा आमचा क्लब आहे. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला एकत्र जमताे. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणावरुन आम्ही शहरात या व्हिंटेज गाड्यांची रॅली काढताे. 40 ते 50 वर्षापूर्वीच्या या सर्व कार आहेत. त्याचबराेबर आम्ही विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असताे. या सगळ्या गाड्यांची निगा प्रत्येक मालक आपल्या मुलांसारखे राखत असताे. या गाड्या आहेत तशा ठेवणे अवघड काम असले तरी हे सर्व सदस्य ते तितक्यात आनंदाने करत असतात. 

Web Title: Video: vintage car rally on the occasion of republic day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.