हा विजय वाचाळवीरांसाठी सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:17 AM2020-12-05T04:17:32+5:302020-12-05T04:17:32+5:30

पुणे : आजचा जो विजय आम्हाला मिळाला आहे, त्यावरून सुशिक्षित आणि शिक्षक वर्ग आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची ...

This victory was a resounding success for the speakers | हा विजय वाचाळवीरांसाठी सणसणीत टोला

हा विजय वाचाळवीरांसाठी सणसणीत टोला

Next

पुणे : आजचा जो विजय आम्हाला मिळाला आहे, त्यावरून सुशिक्षित आणि शिक्षक वर्ग आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची मक्तेदारी असलेली पुणे, नागपुरची जागाही आम्ही जिंकली आहे. त्यामुळे जे वाचावळवीर आहेत, त्यांना हा एक सणसणीत टोला बसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इंन्सिट्युटमध्ये एका बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आजच्या विजयाने महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. भविष्यातील निवडणूका देखील आम्ही एकत्रित करीत आहोत. आमच्या वेगळं लढण्याने विरोधकांचं फावणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. यासाठी तीनही पक्षांचे वरीष्ठ निर्णय घेणार आहेत. अमरावतीची जागा जिंकता आली असती तर आणखी आनंद झाला असता. तिथं जे घडलं त्याचं दुःख आहे.

जयंत पाटील म्हणाले,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसे असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलणे आवश्यक नाही. त्यांच्या आव्हानाबद्दल नंतर बघता येईल. भाजपच्या काही नेत्यांना स्वप्न पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना अमिष दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी राजीनामा दिला आणि त्यांनी पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल.

धुळे- नंदुरबारमधे भाजपने आमचेच उमेदवार फोडून निवडणूक लढवली. अमरीश पटेल यांच्याव्यतिरिक्त इतर उमेदवार असता. तर वेगळा निकाल लागला असता. पदवीधरचा मतदार हा चिकित्सक आणि विचारी असतो. त्यामुळे या निकालाचे वेगळं महत्व आहे. तसेच जयसिंगराव गायकवाड आल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला असल्याचे टोपे म्हणाले.

Web Title: This victory was a resounding success for the speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.