Vehicles breaken incident on Sinhagad road, crime registred | सिंहगड रस्त्यावर वाहनांची तोडफोड, गुन्हा दाखल 
सिंहगड रस्त्यावर वाहनांची तोडफोड, गुन्हा दाखल 

ठळक मुद्देया घटनेबाबत अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू सोसायट्या मध्येही सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे पाच वाहनांच्या काचा फोडून टेप रेकॉर्डर चोरीला गेले आहेत. हा प्रकार बुधवार पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. वडगांव बुद्रुक येथील शांतीनगर भागात जॉगिंग ट्रॅक जवळ रस्त्याच्या बाजूला परिसरातील रहिवाशी कार पार्किंग करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गाड्या पार्क केल्या असताना पहाटे दोनच्या सुमारास होंडा सिटी कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून आतील टेप रेकॉर्डर चोरून नेले आहेत. चोरीला गेलेले सर्व टेप रेकॉर्डर हे टचस्क्रीन आहेत. या ठिकाणी बरीच वाहने पार्क केलेली असली तरी चोरट्यांनी फक्त अत्याधुनिक टेपरेकॉर्डर असणाऱ्या  वाहनांच्या काचा फोडून टेप रेकॉर्डर चोरून नेले आहेत. परिसरात असणाऱ्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून गुन्हा दाखल करण्यात आहे.

.......................

या घटनेबाबत अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तसेच नागरिकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. तसेच सोसायट्या मध्येही सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.
- सतीश उमरे, सहायक पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे


Web Title: Vehicles breaken incident on Sinhagad road, crime registred
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.