कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:28 PM2021-10-14T16:28:17+5:302021-10-14T16:32:44+5:30

आयसीएसआयतर्फे जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएस परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात वैष्णवी बियाणी हिने देशात प्रथम, मोदिता साहू हिने द्वितीय तर वंदिता टांक हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे (icsi result, vaishnavi biyani)

vaishnavi biyani first in cs exam katraj | कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली

कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली

googlenewsNext

पुणे: दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पुण्यातील कात्रज परिसरात राहणारी वैष्णवी बियाणी हिने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शालेय शिक्षणापासून सीएसपर्यंतचे शिक्षण शिष्यवृत्ती मिळवूनच पूर्ण करत वैष्णवीने हे यश संपादन केले आहे.

आयसीएसआयतर्फे जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएस परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात वैष्णवी बियाणी हिने देशात प्रथम, मोदिता साहू हिने द्वितीय तर वंदिता टांक हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कविशा भटणागर, काजल काकवानी, पार्वथी एस, नमिता दधिज ,दिव्या गुप्ता, जिग्यासा कुमारी, निधी देधिय, साक्षी पोरवाल यांनी देशात अव्वल क्रमांक पटकवला आहे.

वैष्णवीने कात्रज भागातील सुखसागरनगरमधील हिरामण बनकर शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर नूतन मराठी विद्यालयातून कॉमर्स शाखेतून अकरावी बारावीचे शिक्षण घेतले. वैष्णवीने सीए परीक्षेत टप्प्या टप्प्याने आपली रँक वाढवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने सीएच्या फाऊंडेशन म्हणजेच पहिल्या पायरीच्या परीक्षेतही देशात 17 वा तर दुस-या पायरीत म्हणजेच एक्झिक्युटिव्ह परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवला होता.

वैष्णवी म्हणाली, घरची परिस्थिती हालाखीची असल्यानेमुळे मला विद्यार्थी विकास योजनेंतर्गत शिष्यवृती घेऊनच सर्व शिक्षण पूर्ण करावे लागले. मला तीन बहिणी असून आई -वडिल स्टेशनरीचे दुकान चालवतात. प्रथम क्रमांक मिळाल्याने खूप आनंद होत आहे. सध्या मी प्रशिक्षण घेत असून सुरूवातीला माझी सीएस म्हणून नोकरी करण्याची इच्छा आहे.

Web Title: vaishnavi biyani first in cs exam katraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.