पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; शेती पिकांचे अतोनात नुकसान, हजारो शेळ्या - मेंढ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:58 PM2021-12-02T19:58:59+5:302021-12-02T19:59:08+5:30

शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले

Unseasonal rains and cold snap in Pune; Thousands of sheep and goats were slaughtered | पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; शेती पिकांचे अतोनात नुकसान, हजारो शेळ्या - मेंढ्या दगावल्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; शेती पिकांचे अतोनात नुकसान, हजारो शेळ्या - मेंढ्या दगावल्या

Next

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३५ शेळ्यामेंढ्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३४ शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. तर काही ठिकाणी मोठी जनावरे देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात शेतीपिकाला प्रचंड फटका बसला आहे. द्राक्षबागाबरोबरच लागवडीला आलेले कांद्याची रोप भुईसपाट झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू, हरभरा व अन्य सर्व कडधान्य वाय गेल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही ठिकाणी घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड देखील झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यात शेळा-मेढ्यांचे तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज 

तालुका      गाव      शेळ्यामेंढ्या (मृत्यू) 
आंबेगाव    10           169
शिरूर        05           109
खेड           04             73
जुन्नर         15         541
हवेली        02             17
भोर           1               02
मावळ       02            36
बारामती     06          40
दौंड           03            24
पुरंदर         07          119

Web Title: Unseasonal rains and cold snap in Pune; Thousands of sheep and goats were slaughtered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.