उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:28 PM2021-06-20T13:28:12+5:302021-06-20T13:37:12+5:30

राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे मला विशेष वाटते

Uddhav Thackeray did not give up Hindutva, so how did Mahasiv Aghadi become Maha Vikas Aghadi? Question by Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा सवाल

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा सवाल

Next
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बचावात्मक भूमिका

पुणे: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना विरोधकांवर टिका केली. अजूनही आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. त्यांनतर 18 महिन्यातच हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

पुण्यात झालेल्या पंडित भास्करराव चंदावरकर यांच्या पथ नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. 

पाटील म्हणाले,  राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे मला विशेष वाटते. अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पाटलांची बचावात्मक भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बचावात्मक भूमिका घेत ते म्हणाले, नेत्यांचा काही दोष नसतो. प्रत्येक वेळेला टिका करायला पाहिजेच असे नाही. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगावे. अशा वेळी  संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवणे गरजेचे आहे. कार्यक्रम ऑनलाईन असता तर एवढी गर्दी झाली नसती. अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या अनुयायांनी त्यांना अडचणीत आणू नये.

Web Title: Uddhav Thackeray did not give up Hindutva, so how did Mahasiv Aghadi become Maha Vikas Aghadi? Question by Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.