पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 04:24 PM2020-11-30T16:24:21+5:302020-11-30T16:37:47+5:30

सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेजसमोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता. 

Two death in accident on Pune-Solapur road | पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीला अपघात, 2 जणांचा मृत्यू

googlenewsNext

लोणी काळभोर : पनवेल येथे निघालेल्या टेक्निशियनने आपली दुचाकी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकू नये म्हणून कट मारण्याच्या प्रयत्नात दुचाकी गॅरेजचे शेड लोखंडी खांबाला धडकुन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच मृत्युमुखी पडले असल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.
        या अपघातात विनायक अंबरूषी मोरे ( वय ३७, रा. गणेगाव, ता भुम, जि उस्मानाबाद ) व त्यांचा मित्र ईश्वर व्यंकटराव मुंगळे ( वय २५, रा. हलगारा, ता. निलंगा, जि. लातुर दोघेही सध्या रा. युआरसी अपार्टमेंट, लोधीवली, दान फाटयाजवळ, रसायणी, पनवेल, जि. रायगड  ) हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे सध्या सिप्ला कंपनी नवी मुंबई येथे अंन्वेन्टीया हेल्थ केअर लि. कंपनी, अंबरनाथ, ठाणे एमआयडीसीमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरीस असुन सध्या ते तात्पुरते रसायणी, पनवेल येथे त्यांचे मित्रांसोबत राहण्यास होते. अधुन मधून ते आपले मूळगावी येत जात होते.
          रविवारी(दि. २९ ) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विनायक मोरे हे त्यांची दुचाकी होंडा शाईन (एमएच ४६ बीएक्स ५२३२) ही वरून त्याचे कंपनीत काम करणारा मित्र ईश्वर मुंगळे हे  गणेगाव येेेथून पनवेल येथे जाणेसाठी निघाले. त्यावेळी मोरे हे दुचाकी चालवत होते. मध्यरात्री ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत माळीमळा येथे आले त्यावेळी सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेजसमोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता. त्याला दुचाकी धडकू नये म्हणून मोरे यांनी तो ट्रक चुकवला व दुचाकी महामार्गाचे खाली घेतली. परंतू दुर्दैवाने दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गॅरेजचे शेडचे लोखंडी खांबाला उजवीकडुन धडकले व समोर जावून पडले. यामुळे सदरचा खांब वाकला. तर दुचाकी त्या पुढील होर्डींगचे लोखंडी खांबाला धडकून अडकली. त्यामुळे त्यामुळे मोरे व मुंगळे यांचे डोके हात - पाय तसेच शरीरावर गंभीर जखमा झाल्याने ते जागेवरच मयत झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मयत अनोळखी असल्याने एका मयताचे फोन वरून संपर्क साधला. त्यानंतर काही वेळाने मोरे यांचे मावसभाऊ मिलींद विश्वनाथ मोरे ( वय ४७, रा. सर्वे नंबर ३९, देवकर मेडिकलमागे, शिंदे वस्ती, मांजरी रोड, केशवनगर, मुंढवा, पुणे ) हे पोहोचले. ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर दोन्ही मृतदेह त्यांचे ताब्यात देण्यात आले. 

Web Title: Two death in accident on Pune-Solapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.