सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:45 AM2020-08-20T10:45:06+5:302020-08-20T11:38:13+5:30

पार्थ पवार यांच्या 'सत्यमेव जयते' या ट्विटमागे 'हे 'असे असू शकते कारण..

The 'truth' in sushant sing rajput case will come out soon: MP Girish Bapat | सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

Next
ठळक मुद्देलोकसभेची उमेदवारी देताना पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का.? शरद पवारांना टोला

पुणे : राजकीय जीवनात प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबियांचेच आहे. तसेच ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यावेळी पार्थ पवार यांची किंमत कळली नव्हती का ? की त्यांना अशीच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती असा प्रश्न उपस्थित करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येतील असेेही तेे म्हणाले.

तसेच पार्थ पवार यांना देखील सुशांत प्रकरणात काहीतरी मोठे सत्य दडपले जात असल्याचे वाटलं असेल. त्यामुळेच 'ते ' सत्य आपण बाहेर काढावे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले असेेल, अशा शब्दात बापट यांनी पार्थ यांच्या ट्विट वर देखील रोखठोक भाष्य केले. 

 

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली.तसेच संथ गतीने सुरू असलेले जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामाबाबत त्यांनी पीएमआरडीए चे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन सादर करून नाराजी व्यक्त करत, वेळेत काम न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

बापट म्हणाले,राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. आपण राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नये. जेणेकरून त्यातून काही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे त्याला किंमत किती हे सर्वांना अगोदरपासून माहिती आहे. कोणाच्या मागे कोण उभा आहे ,हे थोड्या दिवसांत कळेल, ते ही बाहेर येईल.तसेच सुुशांत प्रकरणात अनेक सत्य दडपली जात आहेत. ती सर्व सत्य लवकरच बाहेर येेणार आहे.

पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत बापट म्हणाले,भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. ती विचारसरणी पार्थ यांना पटते का हे त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात भाजपची मंडळी हुशार आहे, आणि योग्य तो निर्णय ते घेतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
........
काय आहे नेमके पार्थ पवार प्रकरण..  
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देत केलेली 'सीबीआय चौकशीची मागणी' असो किंवा 'जय श्री राम' म्हणत राम मंदिराच्या उभारणीला दिलेल्या शुभेच्छा दिल्याने ते राजकीय चर्चेत आले होते. मात्र राष्ट्रवादीच्या विसंगत भूमिका घेतल्याने त्यांचे आजोबा व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पार्थ पवार यांना सार्वजनिकरित्या फटकारले होते. त्यानंतर पवार कुटुंबात नवा वाद उद्भवला होता. मात्र, बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या त्यानंतर स्नेह भोजनानंतर पवार कुटुंबातल्या या वादावर वादावर पडदा पडला होता. पण बुधवारी ( दि. १९) सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा  तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय दिला.त्यानंतर पुन्हा एकदा पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे.

Web Title: The 'truth' in sushant sing rajput case will come out soon: MP Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.