Video : पुण्यात भीषण अपघात ; मालट्रकचे नियंत्रण सुटून आठ वाहनांना दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 11:59 AM2020-10-06T11:59:56+5:302020-10-06T15:49:26+5:30

एक ठार, पाच जखमी :नवले पुलावरील घटना

The truck lost control and hit eight vehicles; Serious accident in Pune | Video : पुण्यात भीषण अपघात ; मालट्रकचे नियंत्रण सुटून आठ वाहनांना दिली धडक

Video : पुण्यात भीषण अपघात ; मालट्रकचे नियंत्रण सुटून आठ वाहनांना दिली धडक

googlenewsNext

पुणे : कात्रज - देहुरोड रोडवरील नर्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर मंगळवारी ( दि. ६)  सकाळी साडे दहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ऑर्किड स्कूलच्या समोर हा अपघात घडला. मालट्रकची धडक इतकी भीषण होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला.


याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहाच्या दरम्यान कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पुढील वाहने एकमेकांना धडकत गेली. या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाचव्यक्ती  जखमी आहेत. झालेल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला  आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर येऊन मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. क्रेनच्या सहाय्याने मालट्रक आणि अपघातग्रस्त वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

Web Title: The truck lost control and hit eight vehicles; Serious accident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.