दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:07 PM2019-10-15T21:07:09+5:302019-10-15T21:11:40+5:30

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने  बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

The truck hit the bus that was standing for repairs; Driver - Carrier death | दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू 

दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू 

googlenewsNext

पुणे (भोर) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने  बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ही घटना मंडळवारी (दि १५) पहाटे ४.३० वाजता घडली.  
 मोहन उत्तम बांदल (वय ५५ रा महुडेबुदुक ता.भोर) या चालकाचा जागीच तर वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण (वय ३५ रा भोळी ता.खंडाळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहन बांदल यांचा मुलगा एस.टी डेपोत कामाला असुन शंकर चहाण याचे वडील वारले असुन ते घरात एककुलते एक असल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  भोर एस.टी आगाराची (एम.एच १४ बी.टी) बस मुंबई सेंट्रलवरुन रात्री निघाली. मुंबई पुणे महामार्गावरील सुस गावाजवळ बस आल्यावर बसचा पुढचा टायर पंक्चर झाला. चालक मोहन बांदल यांनी बस थांबुन झोपेत असलेल्या प्रवाशांना उठवुन बाहेर येण्यास सांगिलते. बसचा टायर बदलत असताना एका भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात टायर बदललत असलेले चालक मोहन उत्तम बांदल यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा  दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 ७५ प्रवाशांचे प्राण वाचवणा-या चालक वाहकावर काळाचा घाला.

  भोर-महाड एस.टी आगाराच्या बसचे वरंध घाटात ब्रेक फेल झाले होते. यावेळी प्रसंगावधान राखुन चालक मोहन बांदल यांनी गाडी बाजुला घेत गाडी दरीत पडता पडता थांबवुन एस.टी मधील ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. आज अखेर अशा गुण चालकावर काळाले घाला घातला यामुळे चालक आणि वाहक यांच्या गावात शोककळा पसरली होती.

Web Title: The truck hit the bus that was standing for repairs; Driver - Carrier death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.