चित्रपटाला शोभेल असा थरार! आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षाच्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 10:43 PM2020-09-16T22:43:33+5:302020-09-16T22:44:20+5:30

बारामतीतील घटना; पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला..

The thrill that will adorn the movie! A woman tries to abduct a child playing with grandfather | चित्रपटाला शोभेल असा थरार! आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षाच्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न 

चित्रपटाला शोभेल असा थरार! आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षाच्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न 

Next
ठळक मुद्देअपहरणाचे कारण अद्याप अस्पष्ट

बारामती: घरासमोर आजोबांच्या मांडीवर खेळणाऱ्या दीड वर्षीय बालकाला मंगळवारी (दि. १५) रात्री ९.१५ च्या सुमारास महिलेने पळवुन नेले.यावेळी बालकाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबांसह दीड वर्षाच्या बाळाला स्थानिक नागरिकांना तिने दगड मारुन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या महिलेचा प्रयत्न फसला.चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग बारामतीच्या भरवस्तीत घडला.त्याची चर्चा सर्वत्र होती.

पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी रात्री हरून मलंग झारी (रा.  माळेगाव रोड कसबा बारामती)  हे त्यांचानातू आहाद (वय दीड वर्षे) यास घराचे समोर खेळवत बसले होते. त्यावेळीतेथे अंधारातून एक महिला चालत आली. तिने हरून झारी यांचे हातातून आहादयास हिसकावले.त्यानंतर त्याला पळवून घेऊन जावू लागली. त्यावेळी  झारी यांनी त्या महिलेस विरोध केल्यावर  तिने त्यांना दगडे फेकुन मारले.यामध्ये हरून यांचे डावे पायावर जखम झाली. त्यावेळी हरून यांनी प्रसंगावधान बाळगत आरडा-ओरड केला.त्यामुळे स्थानिक  तेथे  नागरीक जमा झाले.याच दरम्यान तेथील नागरीकांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना फोनवर संपर्क करीत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी तत्परतेने घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल पोपट कोकाटे व महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांना सरकारी वाहनासह पाठविले. त्यामुळे पोलीस मदत त्याठिकाणी पोहचली.यावेळी महिला लोकांना दगडे मारत होती. कोकाटे व काळे यांनी प्रसंगावधान दाखवत मोठया कौशल्याने त्या बाईचे ताब्यातून त्या दीड वर्षाचा बालक आहाद याची सुखरूप सुटका केली. त्या बाईस पोलीस स्टेशन येथे घेवुन आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत जयपाल विराज पवार (वय ३५, रा. इंदापुर दुध डेअरीजवळ, इंदापुर) असे नाव त्या महिलेने सांगितले.हरून मलंग झारी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांमधुन पोलीसांचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.डी.साळुखे तपास करत आहेत. अपहरणाचे कारण समजु शकले नाही.पोलीस याबाबत तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
—————————————————

Web Title: The thrill that will adorn the movie! A woman tries to abduct a child playing with grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.