धक्कादायक! लोणीकाळभोरला एकाच दिवसात १७ वर्षाच्या मुलीसह तिघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:12 PM2020-12-29T12:12:27+5:302020-12-29T12:13:54+5:30

कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात घडल्या घटना...

Three suicide cases including a 17-year-old girl at Lonikalbhor | धक्कादायक! लोणीकाळभोरला एकाच दिवसात १७ वर्षाच्या मुलीसह तिघांची आत्महत्या

धक्कादायक! लोणीकाळभोरला एकाच दिवसात १७ वर्षाच्या मुलीसह तिघांची आत्महत्या

googlenewsNext

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे तीन वेगवेगळ्या घटनांत एका १७ वर्षाच्या मुलीसह तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.  कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात या घटना घडल्या आहेत.

      वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार भावना जितन सोलंकी (वय १७, रा.घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती ), अभिषेक आनंदा गायकवाड (वय १९, रा. कोरेगाव मुळ ) व गुलाब विष्णू आंबेकर (वय ४८, रा.कुंजीरवाडी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. तिघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.  भावना सोलंकी हिचा विवाह नुकताच ठरला होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भावना दिवसभर, तिच्या भावी पतीशी मोबाईलवरुन बोलत होती. दुपारी ४ च्या सुमारास आराम करण्याच्या नावाखाली ती खोलीत गेली. बराच वेळ बाहेर येत नसल्याने खोलीचा दरवाजा उघडला असता, घऱाच्या छताला ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळुन आले. नातेवाईकांनी भावनास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात नेले. परंतू उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
कुंजीरवाडी येथे गुलाब आंबेकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी ४.३०च्या सुमारांस उघडकीस आला. अविवाहीत असलेले आंबेकर हे गेले कांही वर्षापासुन आजारी होते. तसेच त्यांना काही दिवसापुर्वीच अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. तसेच कोरेगावमुळ येथील तिसऱ्या घटनेत अभिषेक गायकवाड या तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

Web Title: Three suicide cases including a 17-year-old girl at Lonikalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.