पुण्यात एकाच दिवशी ४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ३६ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:04 PM2020-03-28T21:04:16+5:302020-03-28T22:01:49+5:30

एकाच दिवसा चार व्यक्ती कोरोना बाधित

Three person of one family Corona infection report is positive in Pune | पुण्यात एकाच दिवशी ४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ३६ वर 

पुण्यात एकाच दिवशी ४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ३६ वर 

Next

पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या १८१ वर गेली आहे. मात्र, याउलट जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, आणि पोलीस यंत्रणेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या दोन - तीन दिवसांमध्ये घटल्याचे दिसून आले होते. त्यात महाराष्ट्रातील पहिल्या दोन कोरोना रुग्णांसह पिंपरीतील ३ रुग्णांना ठणठणीत बरे झाल्यामुळे दवाखान्यातून घरी सोडण्यात आल्याने काहीसे सकारात्मक आणि दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु , दोन दिवसांच्या विरामानंतर शनिवारी (दि.28) रोजी एकाच दिवशी चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. हे तीनही जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात गेल्या १९ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३६ वर जाऊन पोहोचली आहे .

पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दोन दिवसांनंतर एकाच दिवशी चारने वाढ झाली आहे . प्रशासनासाठी ही गंभीर बाब असून पुण्यासाठी धोक्याचा इशारा देखील असू शकतो. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत कडक उपायोजना केल्या जात आहे .परंतु अद्यापही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे . यामुळेच बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . पुण्यात आतापर्यंत सुमारे  975 करुणा संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 915 संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह  आले आहेत. तर आतापर्यंत 36 संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  सध्या प्रशासनाच्या विलीनीकरण कक्षामध्ये 50  संशयित व्यक्ती वर उपचार सुरु आहे.आता पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ वर असून त्यात पिंपरी चिंचवडमधील संख्या १२ असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या ३६ झाली आहे. 

Web Title: Three person of one family Corona infection report is positive in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.