पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 09:42 AM2020-01-27T09:42:29+5:302020-01-27T09:46:15+5:30

पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन स्फोट झाला आहे.

Three injured in gas blast in Pune | पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट, तीन जण जखमी

पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट, तीन जण जखमी

Next
ठळक मुद्देपुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन स्फोट झाला आहे. सहा महिन्यांच्या मुलीसह आई-वडील गंभीर जखमी.सहा महिन्यांची स्वराली गंभीर जखमी झाली आहे.

पुणे - पुण्यातील खराडी येथे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन स्फोट झाला आहे. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास खराडीमधील संभाजीनगर येथे घडली. शंकर भवाळे (२८), आशाताई शंकर भवाळे ( २२) आणि स्वराली भवाळे (सहा महिने) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील संभाजीनगरमध्ये शंकर भवाळे हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह घरात झोपले होते. रात्री गॅस गळती होऊन तो गॅस स्वयंपाक घरात पसरला होता. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या. पाणी तापविण्यासाठी त्यांनी लाईट लावण्यासाठी बटण दाबले. त्याबरोबर मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे चार खोल्यांवरील पत्रे उडाले. 

स्वयंपाकाच्या ओटावरील गॅस शेगडीवर वरच्या बाजूचे भिंतीच्या वरच्या भागातील सिमेंट पडले. शेगडी पूर्ण वाकडी झाली आहे. गॅस सिलेंडर व्यवस्थित आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व कपडे व इतर साहित्य जळून गेले. अग्निशामक दलाने ही आग तातडीने विझविली. या आगीत घरातील तिघेही जखमी झाले असून सहा महिन्यांची स्वराली गंभीर जखमी झाली आहे.


 

महत्त्वाच्या बातम्या 

सरपंच थेट जनतेतूनच हवा; ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाला लागणार ब्रेक?

दिग्गज बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

भारतीय लष्कर झालं सज्ज; 40 दिवस युद्धासाठी पुरेल एवढा शस्त्रसाठा केला जमा, कारण...  

Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

‘अवनी’चा अहवाल न दिल्यास निधी रोखणार; राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा इशारा

 

Web Title: Three injured in gas blast in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.