जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:05 PM2021-04-14T21:05:09+5:302021-04-14T21:05:54+5:30

सराफी व्यावसयिकासह चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

Threatening shoot to the landowner; 20 lakh ransom demanded | जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी

जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी

Next

पुणे : मालकाने जमीन खरेदीखतामधील उर्वरित रक्कम मागितल्याचा राग मनात धरून गोळ्या घालण्याची धमकी देत 20 लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या बुधवार पेठेतील बड्या सराफी व्यावसायिकासह चार जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मे 2016 ते एप्रिल 2021 दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी सराफी व्यावसयिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांच्यासह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रणधीर सोळंकीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांनी 2016 मध्ये वडिलोपार्जित जमीन विक्रीचा व्यवहार आरोपींबरोबर केला होता. त्यांनी आपली जमीन 93 लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी 32 लाख 50 हजार रूपयांची रक्कम आरोपींनी त्यांना दिली होती. उर्वरित 60 लाख 25 हजार रूपयांची रक्कम फिर्यादी सोळंकी यांच्या दुकानात गेले असता त्यांनी चेक देण्यास नकार दिला.

त्यानंतर फिर्यादी हे मध्यस्थी असलेल्या दिलीप यादव यांच्या कार्यालयात गेले. मात्र यादव आणि साप्ते यांनी त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर त्यांच्या अंगावर रोखले आणि 20 लाख रूपये दिल्याशिवाय चेक देणार नाही. काय करायच ते कर. पुन्हा आला तर गोळ्या घालीन आणि पोलिसांमध्ये गेलास तर याद राख अशी धमकी त्यांनी फिर्यादी यांना दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खातरजमा करून त्यांच्या ऑफिस व घरावर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. छाप्या दरम्यान शंभरहून अधिक मूळ खरेदीखत, साठेखत, विसारपावती, संमतीपत्र, करारनामे, एमओयू मिळाले आहेत.यात सही केलेले ब्लँक चेकबुक व चेक, सही केलेले मुद्रांक, दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विरोधी पथकाचे खंडणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.
--------------------------------

Web Title: Threatening shoot to the landowner; 20 lakh ransom demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.