मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;18 लाख 53 हजारांची रक्कम लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 05:53 PM2021-01-29T17:53:43+5:302021-01-29T17:57:41+5:30

सीसीटीव्हीत चोरटे झाले कैद...

Thieves was robbed on State Bank of India ATM in the Manchar; 18 lakh 53 thousand theft | मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;18 लाख 53 हजारांची रक्कम लंपास 

मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;18 लाख 53 हजारांची रक्कम लंपास 

Next

मंचर: शहराच्या भरवस्तीतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील कॅश डिपॉझिट मशीन चोरट्यांनी शुक्रवारी(दि.२९ ) पहाटे चोरून नेले आहे. यात मशीनमधील 18 लाख 53 हजार 800 रु[यांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. तसेच या घटनेत पन्नास हजार रुपये किमतीचे कॅश डिपॉझिट मशीन चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस त्यांच्या तपासावर आहेत.याबाबत स्टेट बँकेच्या मॅनेजर वंदना पांडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंचर शहराच्या गजबजलेल्या भागात पुणे नाशिक महामार्गावर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेच्या बाहेरील बाजूस एक एटीएम मशीन, एक कॅश डिपॉझिट मशीन व एक पासबुक प्रिंटिंग मशीन असे तीन मशीन आहेत. शुक्रवारी पहाटे 3:30 ते 3:40 च्या दरम्यान सहा चोरट्यांनी कॅश डिपॉझिट मशीन कशाच्या तरी साह्याने टेम्पोला बांधून बाहेर ओढत आणले आहे. हे मशीन टेम्पो टाकून काही क्षणात चोरटे पळून गेले आहेत. मशीनमध्ये 18 लाख 53 हजार 800 रुपये किमतीच्या नोटा होत्या. त्यामध्ये 500 रुपये किमतीच्या 2802 नोटा, दोनशे रुपये किमतीच्या 726 नोटा, शंभर रुपये किमतीच्या 616 नोटा असा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. त्याचबरोबर 50 हजार रुपये किमतीचे कॅश डिपॉझिट मशीन चोरट्यांनी पळवले आहे. एकूण 19 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. 

दोन महिन्यापूर्वी देखील मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावरील भर वस्तीतील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन स्कार्पिओ गाडीच्या साह्याने ओढत नेऊन लंपास केले होते. अजून याच गोष्टीचा तपास लागला नसून आता स्टेट बँकेचे मशीन चोरट्यांनी पळविले आहे. मंचर शहरात एकूण आठ एटीएम सेंटर असून त्यापैकी बहुतांश एटीएम सेंटर हे रामभरोसे आहेत. शहरातील फक्त दोन ते तीन एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते,मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खबाले यांनी पहाटेपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

Web Title: Thieves was robbed on State Bank of India ATM in the Manchar; 18 lakh 53 thousand theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.