"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:00 PM2022-05-20T13:00:53+5:302022-05-20T13:29:52+5:30

सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती

their sabha was in the evening Criticism of Ajit Pawar raj Thackeray morning sabha in Pune | "यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

"यांची सभा तर संध्याकाळी होते", अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

googlenewsNext

पुणे : पुण्यात रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा होणार आहे. शहरात सभेसाठी दोन ठिकाणे पाहण्यात आली होती. त्यापैकी एक मुळा मुठा नदीपात्र निश्चित करण्यात आले होते. परंतु पावसाचे कारण देत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात सभा रद्द झाल्याचे सांगितले. अखेर स्वारगेटला रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण राज ठाकरे नेहमी सायंकाळी सभा घेतात. पण यावेळी मात्र चक्क सकाळी सभा ठेवल्याने चर्चाना उधाण आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्या सभेवरूनच अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली होती. आता सकाळी सभा घेऊन राज यांनी अजित पवारांचे चॅलेंज स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राज ठाकरेंनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोंगे, हिंदुत्व, या मुद्द्यांना हात घातला होता. त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. पुण्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्याबाबतही ते पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. 

पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित   

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे... हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. 

Read in English

Web Title: their sabha was in the evening Criticism of Ajit Pawar raj Thackeray morning sabha in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.