एफटीआयच्या विद्यार्थिनीस लुटणारा सराईत चोरटा जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 09:03 PM2020-01-13T21:03:45+5:302020-01-13T21:14:13+5:30

चहा पिण्यासाठी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी संस्थेतून बाहेर पडले होते एफटीआयआयची ३१ वर्षाची विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी...

Theft by showing knief to FTII student | एफटीआयच्या विद्यार्थिनीस लुटणारा सराईत चोरटा जेरबंद 

एफटीआयच्या विद्यार्थिनीस लुटणारा सराईत चोरटा जेरबंद 

Next
ठळक मुद्दे८०० रुपये, मोबाईल, इतर कागदपत्रे असा ९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

पुणे : राष्ट्रीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट निर्मिती संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थिनीला शस्राचा धाक दाखवून तिचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्यास पकडण्यात दीड महिन्यानंतर पोलिसांना यश आले आहे.
उबेद सलीम शेख (वय २५, रा़ कसबा पेठ) असे या सराईताचे नाव आहे. ही घटना लॉ कॉलेज रोडवरील कॅफे कॉफी डेसमोर २५ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजता घडली होती. गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास तसेच उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती काढून शोध घेण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यातील दाखल जबरी चोरीचा तपास लागला नव्हता. पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे व त्यांचे सहकारी तपास करीत असताना उबेद शेख हा चोरीला गेलेला मोबर्इाल वापरत असल्याचे आढळून आले. तो मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण मित्र मंडळाजवळ आला असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेला असताना तो मंडळाजवळ बसलेला दिसला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल सापडला़ चौकशी केली असताना आपण साथीदारांसह लॉ कॉलेज रोडवरुन हा मोबाईल चोरला असल्याचे सांगितले. 
एफटीआयआयची ३१ वर्षाची विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री संस्थेत चित्रीकरण करत होते. त्यानंतर ते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी संस्थेतून बाहेर पडले. विधी महाविद्यालय रस्त्यावरील कॅफे कॉफी डे समोर दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी दोघांना अडविले. कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडील ८०० रुपये, मोबाईल, इतर कागदपत्रे असा ९ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन नळस्टॉप चौकाच्या दिशेने पळून गेले होते. 

Web Title: Theft by showing knief to FTII student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.