पर तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:24 PM2020-01-20T19:24:28+5:302020-01-20T19:27:38+5:30

मागील पाच वर्षांत शिक्षकांचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडविण्याचे दिले होते आश्वासन..

teachers will send home who transfered in other taluka | पर तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवणार

पर तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवणार

googlenewsNext
ठळक मुद्देज्येष्ठ नेते शरद पवार राज्य शासनाला सुचना करणारमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत निर्णय घेणार

बारामती : राज्यभरातील मागील पाच वर्षांत गैरसोयीने परतालुक्यात बदली झालेल्याशिक्षकांना स्वगृही पाठवण्यात येईल , यापुढे सोयीच्याच बदल्या होतील.यासंबधीचा शासन निर्णय शिक्षक संघाच्या फेब्रुवारीमधील नियोजित अलिबागयेथील राज्यअधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. याबाबत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. मागील पाच वर्षांत शिक्षकांचे रखडलेले प्रश्न खातेवाटप झाल्यानंतर तातडीने सोडविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या सभेचेआयोजन करण्यात आले होते.
 पर तालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या विशेष बाब म्हणून मूळ तालुक्यात बदल्या करा व यापुढील प्रशासकीय बदल्या तालुकांतर्गत करा ही शिक्षक संघाची मागणी मान्य करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याचे देखील मारणे यांनी सांगितले.
  कोल्हापुर येथील  महामंडळ सभेसाठी शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामाविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील , खासदार धैर्यशील माने, महापौर सुरमंजिरी लाटकर, आमदार राजेश पाटील , आमदार राजू आवाळे, ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते, संभाजीराव थोरात यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मागण्या केल्या, प्रास्ताविक मोहन भोसले यांनी व आभार राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबरे यांनी मानले. या महामंडळ सभेस राज्यातील जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील हजारो शिक्षक उपस्थित होते,अशी माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
———————————
 मंत्रालयात स्वतंत्र बैठक
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात महिनाभरात ग्रामविकास मंत्री,शिक्षण मंत्री, नगरविकास मंत्री यांच्या सोबत शिक्षक संघाची स्वतंत्रबैठक घेण्यात येईल व या सभेस स्वत: उपस्थित राहण्याची घोषणा शरद पवारयांनी केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
————————————————

 शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न
जुनी पेन्शन योजना, नगरपालिकांना वेतनअनुदान, बी.एल.ओ कामातुन मुक्ती, शिक्षकांमधुनच पदोन्नती, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ, वेतन आयोगातील वेतनत्रुटी

Web Title: teachers will send home who transfered in other taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.