Supriya Sule : शरद पवारांवर टिका करणाऱ्या फडणवीसांना सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:52 PM2022-01-17T17:52:28+5:302022-01-17T17:53:19+5:30

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावं लागतं.

Supriya Sule : Supriya Sule slaps Fadnavis for criticizing Sharad Pawar | Supriya Sule : शरद पवारांवर टिका करणाऱ्या फडणवीसांना सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

Supriya Sule : शरद पवारांवर टिका करणाऱ्या फडणवीसांना सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

Next

पुणे - भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शाब्दीत जुगलबंदी अनेकदा पाहायला मिळते. शरद पवार यांचा आदर राखून फडणवीस त्यांच्यावर अनेकदा टिकाही करतात. सध्या देशातील 5 राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून त्यावरुन राजकारण रंगत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, आता खासदार सुप्रिय सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावं लागतं. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, अशी बोचरी टीका फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केली होती. 

फडणवीसांच्या या टिकेला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वक्तव्य करताना, हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता. सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना खोचक शब्दात टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देऊ नये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावरही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलं. कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Supriya Sule : Supriya Sule slaps Fadnavis for criticizing Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.