मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:47 PM2020-05-11T12:47:09+5:302020-05-11T12:47:33+5:30

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

Suicide by hanging at the residence of a women lawyer in Manchar | मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्युपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद

मंचर : शहरातील एका महिलावकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .रूपाली वसंत थोरात( वय 32 )असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. महिला वकिलाने मृत्युपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरातील विठ्ठल ओंकार या इमारतीतील सदनिका क्रमांक 403 मध्ये रूपाली वसंत थोरात ही महिला वकील राहत होती . रात्री घरी ती एकटीच होती . त्यानंतर तिने घरी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर इमारतीचे मालक राजेश इंदोरे यांनी ही माहिती थोरात यांच्या कुटुंबीयांना दिली. पोलीस समवेत नातेवाईक सदर सदनिकेवर गेले त्यावेळेस रूपाली  थोरात यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले .यावेळी तेथे असलेल्या एका डायरीमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही . माझ्या मृत्युनंतर माज्या मुलीचा सांभाळ बहिणीने करावा. तसेच माझी असलेली सर्व संपत्ती ही मुलीला द्यावी असे या महिला वकिलाने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे .दरम्यान मंचर उपजिल्हा रुग्णालयात रूपाली थोरात यांचे शवविच्छेदन करण्यात आले .त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .तानाजी रामचंद्र जाधव (रा. मंचर )यांनी याबाबतची माहिती मंचर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत दाखल केले आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पी.एम. मोरे करत आहेत.

Web Title: Suicide by hanging at the residence of a women lawyer in Manchar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.