Video: मुलगी झाली हो...! पुण्यात मुलीचा अनोखा जन्मसोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:02 PM2022-04-05T15:02:24+5:302022-04-05T15:04:09+5:30

आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले

Such a birth ceremony of a girl in pune girl was brought home by helicopter | Video: मुलगी झाली हो...! पुण्यात मुलीचा अनोखा जन्मसोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

Video: मुलगी झाली हो...! पुण्यात मुलीचा अनोखा जन्मसोहळा; हेलिकॉप्टरमधून चिमुकलीला आणलं घरी

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात काही वर्षापूर्वी मुलगा हवाच याचा अट्टाहास धरला जात होता. मात्र अलीकडे ही परिस्थिती बदलत असून मुलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला जात आहे. यामुळे बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना संदेश दिला जात असून, सामाजिक बदलाला चालना मिळत आहे. 
      
खेड तालुक्यातील शेलगाव येथे नुकतचं मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत. पण मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरण्याची घटना या भागात प्रथमच घडली आहे. मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तर आई आणि बाळावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले. 

गावात हेलिकॉप्टर उतरताना बघण्यासाठी आणि मुलीची एक झलक बघण्यासाठी गावकरीही उपस्थित होते. आनंदानं, उत्साहानं मुलीच्या जन्माच्या शुभेच्छांच्या जयघोषात चिमुरडीचे वडिलांनी चिमुकल्या मुलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले. ‘माझ्या नवजात मुलीला हेलिकॉप्टरमध्ये आणून, मुलीचा जन्म एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा हाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे,’ असं ऍड. विशाल झरेकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वास्तविक ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबानं आपल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणून तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ही अतिशय उल्लेखनीय घटना असून, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केलं आहे, यात शंका नाही.

Web Title: Such a birth ceremony of a girl in pune girl was brought home by helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.