कुणी घर देतं का घर?..कुटुंबाच्या नावावर सर्व संपत्ती करून घर सोडलेल्या एका 'बाबां'ची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 07:08 PM2020-09-08T19:08:37+5:302020-09-09T11:51:01+5:30

भिक्षेक-यांसाठी देवदूत समजल्या जाणा-या डॉ. अभिजित सोनावणे यांना ‘निर्वस्त्र’ अवस्थेत केवळ शाल ओढलेले, इंग्रजीमध्ये संवाद साधणारे हे बाबा भेटले आणि त्यांच्याबरोबर निर्माण झालं त्यांचं एक अनामिक नातं.

Story of man who lives in pune and left home after property declaration for family | कुणी घर देतं का घर?..कुटुंबाच्या नावावर सर्व संपत्ती करून घर सोडलेल्या एका 'बाबां'ची व्यथा

कुणी घर देतं का घर?..कुटुंबाच्या नावावर सर्व संपत्ती करून घर सोडलेल्या एका 'बाबां'ची व्यथा

googlenewsNext

नम्रता फडणीस- 

पुणे : प्रतिष्ठित कंपनीमध्ये भूषवलेलं उच्च पदावर आणि चांगल्या पगाराची नोकरी होती. एका सुखी माणसाला अजून काय हवं! मात्र याच सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले. अखेर सर्व संपत्ती कुटुंबाच्या नावावर करून आहे, त्या कपड्यानिशी या गृहस्थानं’ घर सोडले. फुटपाथवर झोपत मिळेल ते अन्न खात या‘बाबां’चं जगणं सुरूझालं.  भिक्षेक-यांसाठी देवदूत समजल्या जाणा-या डॉ. अभिजित सोनावणे यांना ‘निर्वस्त्र’ अवस्थेत केवळ शाल ओढलेले, इंग्रजीमध्ये संवाद साधणारे हे बाबा भेटले आणि त्यांच्याबरोबर निर्माण झालं त्यांचं एक अनामिक नातं.

बाबांचे पुढील आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मराठवाडयामध्ये त्यांची मंगळवारी (8 सप्टेंबर)सकाळी पाठवणी करताना  डॉ.सोनावणे आणि त्यांची पत्नी मनीषा सोनावणे यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.एका चित्रपटाला शोभेल अशीच  ही काहीशी कथा. आई वडिलांची प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणा-या स्वार्थी मुलांच्या कहाण्या नवीन नाहीत. मात्र एका प्रॉपर्टी वादाच्या त्रासाने आपणहून घर सोडलेल्या’बाबा’ची ही कहाणी नि:शब्द करणारी ठरली. हा हदयस्पर्शी अनुभव डॉ. अभिजित सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.

डॉ. अभिजित सोनावणे  म्हणाले की, ''शहरातील अनेक मंदिरांच्या बाहेर बसलेल्या भिक्षेक-यांना भेटतो. त्यांच्यावर उपचार करता करता त्यांच्याबरोबर एक अनामिक नातं तयार होतं. या 75 वर्षीय बाबांशी जुळलेला ॠणानुबंध असाच काहीसा भावस्पर्शी.  एका मंदिराच्या बाहेर बाबा मला भेटले. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मूळ गाव  ‘कोकण’ असल्याचं कळलं. पत्नी, मुली,  भाऊ असं सर्वसामान्यांसारखचं त्यांचं कुटुंब. मात्र कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले. कुटुंबातीलसदस्यांच्या नावाने प्रॉपर्टी केली आणि या वादावादीच्या त्रासातून त्यांनी मागच्या वर्षी घर सोडलं. ते गाडी पकडून पुण्यात आले. हॉटेलच्याबाहेर झोपणं, कुणी खायला दिले तर खाणं..असं त्यांच जगणं सुरू झालं. तुम्ही पुढं काय करणार? असं विचारलं. तेव्हा 'मी कुठतरी काम करेन...मला राहाणं किंवा खाणं दिलं तरी चालेल पण पैसे नको.' म्हणाले. ''

पुढे त्यांनी सांगितले की, '' मी वृद्धाश्रमांमध्ये चौकशी केली तर कोव्हिड काळात कुणी नवीन ज्येष्ठ व्यक्ती घेण्यास सर्वांनी असमर्थता दर्शविली. मग मराठवाड्यात वृद्धाश्रम चालविणा-या एका ताईंची आठवण झाली. पण आम्ही महिला वृद्धाश्रम चालवितो असं त्या म्हणाल्या. काही दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला आणि बाबांना रूग्णालयात एक कायमस्वरूपी खोली व त्यांना जेवणाचा डबा स्वत: देण्याचे प्रेमळपणे त्यांनी मान्य केलं.

बाबांना मराठवाड्यात पाठविण्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविषयी सविस्तर माहितीचे पत्र दिले. त्यांच्या कुटुंबातील लोकांना जर त्यांना शोधावेसे वाटले तर ते सोयीचे होऊ शकेल. पोलिसांची परवानगी घेतल्यानंतर बाबांना शिवशाहीने मंगळवारी सकाळी मराठवाड्याला पाठविले. यामध्ये पत्नी डॉ. मनीषाची साथ मोलाची ठरली.बाबांकडून तिनं हक्काने शाल मागितली आणि ही अमूल्य भेट आमच्यासाठी कायमस्वरूपी ठेवा ठरली.''

हे पण वाचा-

भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

Web Title: Story of man who lives in pune and left home after property declaration for family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.