पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण सुरू करा, महापालिकेकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:55 AM2021-05-18T11:55:45+5:302021-05-18T11:55:51+5:30

जहांगीर रुग्णालयाची दर्शवली तयारी

Start vaccination in Pune city societies, demand made to Municipal Corporation | पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण सुरू करा, महापालिकेकडे केली मागणी

पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण सुरू करा, महापालिकेकडे केली मागणी

Next
ठळक मुद्देमहापालिका आणि जहांगीर रुग्णालय यांच्यात आज बैठक

पुणे: पुणे शहरात सद्यस्थितीत लसीकरण मोहिम संथ गतीने चालू आहे. लसींच्या तुटवड्यामुळे केंद्रांवर नागरिक गर्दी करत आहेत. त्यासाठी सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण सुरू करावे. अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण २० हजार गृहनिर्माण सोसायटी आहेत. त्यापैकी १२ हजार पुणे शहरात आहेत. येथील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जहांगीर रुग्णालयाने सोसायटीत जाऊन लसीकरण सशुल्क सेवा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले आहे. आज याबाबत महापालिका आणि जहांगीर रुग्णालयात बैठक होणार आहे. महापालिकेच्या परवानगीनंतर अंमलबजावणी होईल. 

जहांगीर रुग्णालयाकडून लसीकरणासाठी वाहने आणि मनुष्यबळ देण्यात येणार आहे. पहिला आणि दुसऱ्या डोसबद्दल माहिती मिळवून लसीकरणाची योजना आखण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. मुंबईच्या पालिकेने सोसायटीत लसीकरण सेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर पुण्यात सुरू केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले. 

गृहनिर्माण सोसायट्यांचे व्हाट्स अँप ग्रुप आहेत. त्याद्वारे याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची महासंघाची तयारी आहे. त्यासाठी पुणे महापालिकेची परवानगी अत्यावश्यक असणार आहे. लसींचा पुरवठा हे देखील आव्हान असणार आहे. आजच्या बैठकीत निर्णय होईल. असेही ते म्हणाले आहेत. 

Web Title: Start vaccination in Pune city societies, demand made to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.