गांधींचे विचार मांडा एक लाख मिळवा ; गणेश मंडळांना अनाेखी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 03:37 PM2018-09-08T15:37:05+5:302018-09-08T15:47:55+5:30

गणेशाेत्सवात महात्मा गांधींचे विचार पुढे नेणाऱ्या गणेश मंडळांसाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे अनाेख्या स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले अाहे.

spread gandi thoughts and get 1 lakh ruppes ; compition for ganesh mandals | गांधींचे विचार मांडा एक लाख मिळवा ; गणेश मंडळांना अनाेखी संधी

गांधींचे विचार मांडा एक लाख मिळवा ; गणेश मंडळांना अनाेखी संधी

पुणेमहात्मा गांधींचे विचार पुढे नेणाऱ्या गणेश मंडळांसाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे अनाेख्या स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. गणाेशाेत्सवात पुण्यातील जी गणपती मंडळे महात्मा गांधीजींचे देखावे, व्याख्याने ठेवतील किंवा अन्य काही नाविन्यपूर्ण गाेष्टी करतील अश्या मंडळांना या स्पर्धेत सहभागी हाेता येणार अाहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास एक लाख रुपयांचे पारिताेषिक देण्यात येणार अाहे. महात्मा गांधींच्या जन्माचे हे 150 वे वर्ष असल्याने ही स्पर्धा अायाेजित करण्यात अाली अाहे. अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी पक्षकाद्वारे दिली अाहे. 

    नाविन्य, परिणामकारकता काळानुरूप योग्य संदेश, ऐतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असतील. आजच्या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे, याची निवड हा पारितोषिकासाठी महत्त्वाचा निकष असेल, असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले. पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परिक्षण होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल. इच्छुक गणेश मंडळांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडे अर्ज करावेत असे अावाहन करण्यात अाले अाहे. गणपती विसर्जनानंतर 15 दिवसांत पारितोषिक जाहीर केले जाणार असून त्यानंतर महिनाभरात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हाेणार अाहे. 

Web Title: spread gandi thoughts and get 1 lakh ruppes ; compition for ganesh mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.