भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, टिळक रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:25 IST2025-12-02T17:25:10+5:302025-12-02T17:25:25+5:30
दुचाकीस्वार तरुणी टिळक रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाताना भरधाव टेम्पोने हिराबाग चौकात त्याच्या दुचाकीला धडक दिली.

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, टिळक रस्त्यावरील घटना
पुणे: भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना २७ नोव्हेंबरला रोजी टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरिबा कुरेशी (२०, रा. फेअर ग्रेस सोसायटी, न्यू मोदीखाना, लष्कर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. तर विश्वंभर दशरथ सोनवणे (६२, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याबाबत आरिबाचे वडील अर्शदअली अख्तरअली कुरेशी (५५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरिबा ही २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन स्वारगेटकडे जात होती. त्यावेळी भरधाव टेम्पोने हिराबाग चौकात त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरिबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यना तिचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट तपास करत आहेत.