आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 09:10 PM2019-03-05T21:10:59+5:302019-03-05T21:12:27+5:30

आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे.

social media users angry on taking aloknath in the movie related to metoo | आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले

आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले

Next

पुणे : गेल्या वर्षी मी टू या चळवळीने अवघे सिनेमाविश्व हादरुन गेले हाेते. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, अभिनेत्यांवर मी टू चे आराेप केले हाेते. निर्मात्या -लेखिका विनता नंदा यांनी आलाेकनाथ यांच्यावर बलात्काराचा आराेप केला हाेता. आता हेच आलाेकनाथ मी टू वर आधारीत में भी या सिनेमात चक्क न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत. नासीर खान हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे. चेंज डाॅट ओआरजी या वेबसाईटकडून त्यांच्याविराेधात पिटीशन साईन करण्यात येत असून त्यांच्यावर चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात येत आहे. 

विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पाटीर्नंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची ऑफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माज्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते. केवळ विनता नंदानंतर अन्य काही महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरतर्वनाचे आरोप केले होते.

त्यानंतरही त्यांना मी टू विषयावरच असलेल्या चित्रपटात घेतले जात आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी बाेलताना सायली सहस्रबुद्धे ही तरुणी म्हणाली, आलाेकनाथ यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आराेप आहेत. त्यांच्यावर मी टू या माेहिमेंतर्गत तीन महिलांनी लैंगिक शाेषणाचे आराेप केले आहेत.सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही त्यांच्यावर बंदी लादली आहे. असे असताना त्यांना मी टूवरच आधारीत सिनेमामध्ये न्यायाधीशाची भूमिका देणे हे महिलांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे या विराेधात ऑनलाईन पिटीशन साईन करण्यात येत आहे. 

सिनेक्षेत्रात काम करणारा अविनाश सपकाळ म्हणाला, आलाेकनाथ यांच्यावर सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही बंदी लादली आहे. त्यांच्यावर गंभीर आराेप आहेत, असे असताना त्यांना चित्रपटात घेणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यावर चित्रपटसृष्टीने बहिष्कार घालायला हवा. 

Web Title: social media users angry on taking aloknath in the movie related to metoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.