कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:21 PM2020-05-19T20:21:02+5:302020-05-19T20:31:56+5:30

जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवार मदतीसाठी धावून येतो.

Social commitment to protect Swadhyay Parivar during Corona's period, 55,000 kits distribution | कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप

कोरोनाच्या काळात स्वाध्याय परिवार जपतोय सामाजिक बांधिलकी, ५५ हजार किट्सचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस व इतर कर्मचाऱ्यांसाठी ग्लोव्ह्ज, मास्क व सॅनिटायझर यांचे हजारो किट्स प्रदान

पुणे : कोरोना संकटाने जगभरासह भारतात देखील आपला विळखा घट्ट केला आहे. केंद्र व राज्य सरकारे यांच्यासह आरोग्य विभागाने अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत या संकटाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. संपूर्ण भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे. याच परिस्थितीत स्वाध्याय परिवारातर्फे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दूरवर व जास्त क्षेत्रात फवारणी करू शकणारी विशेष शक्तिशाली फॉगिंग मशिन्स मुंबई येथे राज्याच्या आरोग्य विभागाला तसेच मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, नांदेड येथील पालिकांना प्रदान करण्यात आली होती. तसेच पोलीस, सुरक्षा व इतर वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाच्या या गंभीर प्रसंगातही सतत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी करत त्यांना ग्लोव्ह्ज, मास्क व सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तुंच्या  पुणे, मुंबईसह राज्य व देशभरात विविध ठिकाणी वाटप करण्यात आले आहे. 
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय श्री. राजेश टोपे यांनी स्वाध्याय परिवाराने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत परिवारातर्फे कृतज्ञता देखील व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे. स्वाध्याय परिवाराने आरोग्य विभागाला व विविध पालिकांना दिलेली ही विशेष फॉगिंग मशिन्स निर्जंतुकीकरणासाठी उपयोगात येणार आहे. आतापर्यंत अशी एकूण ८ मशिन्स प्रदान करण्यात आली आहेत.  
जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) आणि त्यांची सुपुत्री पूजनीय सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी नेहमीच सर्वांचीच चिंता केली आहे, काळजी केली आहे.

स्वाध्याय परिवाराने ग्लोव्ह्स, मास्कस व सॅनिटायझर एकत्र असणारे तब्बल ५,००० किट्स नवी मुंबई महानगरपालिकेला तर १,२०० किट्स कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रदान केले आहेत. तसेच महाराष्ट्रात नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी ७,००० म्हणजे असे १४,००० किट्स यापूर्वीच प्रदान करण्यात आले आहेत. आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या सर्वांची काळजी करणाऱ्या या एक प्रकारच्या सैनिकांप्रती आपली कृतज्ञता म्हणून स्वाध्याय परिवार हे करत आहे. आजवर देशात एकूण ५०,००० ते ५५,००० पेक्षा जास्त असे किट्स स्वाध्याय परिवाराने दिले आहेत, तर गुजरात राज्यात २६,००० विविध धान्यांची मोठी पॅकेट्स 'लोकरक्षक दल' या पोलीस विभागाशी संबंधित एका संघटनेला देण्यात आली आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे होत आहे. 

Web Title: Social commitment to protect Swadhyay Parivar during Corona's period, 55,000 kits distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.