पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:12 PM2020-07-04T16:12:46+5:302020-07-04T16:14:54+5:30

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी देशभरात १०९ मार्गांवर १५१ रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली.

Six private trains proposed from Pune; Including Delhi, Patna, Bhopal, Havda routes | पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश

पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश

Next
ठळक मुद्देप्रत्येक मागार्साठी निविदा प्रक्रियेतूनच खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली जाणार

पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील १०९ मार्गांवर खासगी रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित केले असून त्यामध्ये पुण्याला सहा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. पुणे ते दिल्लीसह पटना, भोपाळ, हावडा, प्रयागराज व दिब्रुगढ या मार्गांचा समावेश आहे. यामधील पुणे ते दिल्ली रेल्वे दररोज सोडण्याचे प्रस्तावित असल्याचे समजते.
रेल्वेमार्गांच्या खासगीकरणाला मागील वर्षीपासून सुरूवात झाली आहे. आता त्याला वेग आला असून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी देशभरात १०९ मार्गांवर १५१ रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली. यामध्ये खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित आहे. त्यासाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक मागार्साठी निविदा प्रक्रियेतूनच खासगी क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली जाणार आहे. या गाड्यांच्या तिकीट दराबाबत अद्याप अनिश्चिता असली तरी रेल्वेकडूनच दर निश्चित केले जातील, असे समजते.
दरम्यान, प्रस्तावित खासगी रेल्वेगाड्यांमध्ये पुण्यालाही सहा मार्ग मिळण्याची शक्यता आहे. या मार्गांमध्ये पुणे-दिल्लीचा समावेश असून ही गाडी दररोज सोडण्याची प्रस्तावित आहे. पुणे ते भोपाळ ही गाडी आठवड्यातून तीनदा सोमवार, गुरूवारी व शनिवारी, पुणे ते हावडा ही गाडी आठवड्यातून दोनदा गुरूवार रविवारी सुटू शकेल. तर पुणे ते पटना सोमवार व गुरूवारी, पुणे ते प्रयागराज मंगळवार, गुरूवार व शनिवारी आणि पुणे ते दिब्रुगढ ही गाडी रविवारी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातून मिळणाºया प्रतिसादावर या गाड्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Web Title: Six private trains proposed from Pune; Including Delhi, Patna, Bhopal, Havda routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.