संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:52 PM2017-12-21T12:52:16+5:302017-12-21T12:59:01+5:30

संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले. 

should be 'marketing' of Research: Michael Sivajarvi; International Council in Bharti University | संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

Next
ठळक मुद्देविविध देशांतील सुमारे शंभर प्रतिनिधींनी परिषदेत घेतला सहभागपूना कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने ‘पॉलीटेक २०१७’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले. 
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या पूना कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘पॉलीटेक २०१७’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. जीन मायकेल, प्रा. आशुतोष तिवारी, डॉ. शिवराम, प्राचार्य डॉ. के. आर. महाडिक, परिषदेचे सचिव डॉ. आर. पी. सिंग, उपप्राचार्य डॉ. आत्माराम पवार व डॉ. वर्षा पोखरकर आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये व्याख्याने व पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, आयर्लंड, दक्षिण कोरिया यांसह विविध देशांतील सुमारे शंभर प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला. पॉलिमर्स अ‍ॅन्ड फार्मास्युटिकल सायन्स व इतर अनेक क्षेत्रांत नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर वाढत असून, त्यात संशोधनाच्या अमर्याद संधी असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: should be 'marketing' of Research: Michael Sivajarvi; International Council in Bharti University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.