धक्कादायक! टेम्पो चालकाला कोयत्याच्या धाक दाखवून लुबाडले, तर चालकाच्या आईला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 05:48 PM2021-03-15T17:48:01+5:302021-03-15T17:50:58+5:30

गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांनाही लावले पळवून

Shocking! The tempo robbed the driver out of fear of being stabbed, while the driver's mother was beaten | धक्कादायक! टेम्पो चालकाला कोयत्याच्या धाक दाखवून लुबाडले, तर चालकाच्या आईला केली मारहाण

धक्कादायक! टेम्पो चालकाला कोयत्याच्या धाक दाखवून लुबाडले, तर चालकाच्या आईला केली मारहाण

Next
ठळक मुद्देवारजे पोलिसांकडून दोन गुन्हेगार अटकेत

 रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवुन टेम्पोचालकाला लुबाडून चालकाच्या आईलाही मारहाण केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. 

गौरव सुरेश पासलकर (वय २२, रा. वारजे), मंगेश विजय जडीतकर (वय २०, रा. नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे  दोन साथीदार पल्या चौधरी आणि राजू गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास जानावळे (वय २६, रा.वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात शनिवारी रात्री ११ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जानावळे हा आपल्या आईला घेऊन टेम्पोने जात होता. तेव्हा चौघांनी त्यांना अडवले़. विकास याला टेम्पोतून खाली ओढले. त्याच्या मानेवर कोयता लावून त्याच्याकडील ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या आईने पैसे द्यावेत, म्हणून त्यांना दगड मारुन जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीसाठी येऊ लागले. तेव्हा त्यांनी लोकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावले. गौरव आणि मंगेश हे दोघे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
 

Web Title: Shocking! The tempo robbed the driver out of fear of being stabbed, while the driver's mother was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.