Shocking! The father-in-law was killed who order the murder of son wife; Incidents in Khed taluka | धक्कादायक!सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच संपवले ; खेड तालुक्यातील घटना

धक्कादायक!सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच संपवले ; खेड तालुक्यातील घटना

ठळक मुद्देया प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; परराज्यातील दोघांना अटक

पिंपरी : मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्यालाच मारेकऱ्यांनी संपविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, परराज्यातील दोघा मारेकऱ्यांना चाकण पोलिसांनीअटक केली.

अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. जब्बार आणि मोहम्मद यांना पोलिसांनीअटक केली आहे.

खेड तालुक्यातील वराळे येथील पत्राशेडमध्ये विनायक भिकाजी पानमंद यांचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी आढळला होता. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास करताना मयत पानमंद याने मुलगा अजित याच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्यासाठी राठोड याला सुपारी दिली होती. उत्तरप्रदेशातून पिस्तुल आणण्यासाठी आणि खुनाचा मोबदला म्हणून १ लाख ३४ हजार रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर राठोडने खून न केल्याने पानमंद यांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यामुळे राठोड याने पानमंद यांना खुनाचा कट रचण्याच्या बहाण्याने वराळे येथील पत्राशेडमध्ये बोलावले. पानमंद तेथे गेल्यानंतर इतर आरोपींनी त्यांचा हात धरला. त्यानंतर राठोडने कापडी बेल्टने पानमंद यांचा गळा आवळला. बेल्ट मध्येच तुटल्याने राठोडने हाताने गळा आवळून खून केला. 

याबाबत आयुक्त कृष्णप्रकाश यांनी माहिती दिली की,मारेकरी सुनेचा खून करणारच होते. त्यासाठी त्यांनी पिस्तूलसुध्दा विकत घेतलं होते. मात्र सुपारी देणाऱ्या सासऱ्याने पैसे परत तर मागितलेच शिवाय त्या गुंडांना सांगितले की, ही सुपारी ते दुसऱ्या कोणाला तरी देणार आहे. याच कारणामुळे त्या गुंडांनी सासऱ्याचाच खून केला. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! The father-in-law was killed who order the murder of son wife; Incidents in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.