आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, शिवाजीराव आढळराव पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:36 PM2021-10-19T16:36:56+5:302021-10-19T16:44:06+5:30

शिरूर: शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या जिवीतास धोका असले बाबत निनावी पत्राद्वारे धमकी येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाजामध्ये अशा ...

shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil | आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, शिवाजीराव आढळराव पाटलांची मागणी

आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, शिवाजीराव आढळराव पाटलांची मागणी

Next

शिरूर: शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या जिवीतास धोका असले बाबत निनावी पत्राद्वारे धमकी येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाजामध्ये अशा प्रवृत्ती वाढत चालल्या असून वेळीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

रविवारी (दि. १७) शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले असून त्यामध्ये शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची व त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार यांची निनावी पत्राव्दारे बदनामी करुन आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे.

यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिवसेना जिल्हा संघटक व नगरसेवक संजय देशमुख, तालुका प्रमुख सुधीर फराटे, स्वच्छता आरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार, नगरसेवक मंगेश खांडरे, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, सुभाष गांधी नगरसेविका मनिषा कालेवार, नगरसेविका सुरेखा शितोळे, सुनिता कुरंदळे ज्योती लोखंडे, अंजली थोरात, रोहीणी बनकर शिवसेना शहर प्रमुख मयुर थोरात, तुकाराम खोले , सागर पांढरकामे, राजेंद्र चोपडा उपस्थित होते.

शिरुर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत चांगल्या पध्दतीने पारदर्शी कारभार चालू असल्याचे सांगून अमेरिकेत बोस्टन येथे पाहिलेल्या इमारतीप्रमाणे ही शिरूर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत असल्याचे सांगून कामाचे कौतुक आढळराव पाटलांनी केले. तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष पातळीवर निर्णय घेणार असल्याचे माजी खासदार व शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेना नेते व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूर येथील नवीन नगरपरिषद कार्यालयाची पहाणी केली.

Web Title: shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.